ऑल इन १ ग्रेप्स स्पेशल

 • ‘महाधन ऑल इन १ – ग्रेप्स स्पेशल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खास करून द्राक्षांच्या पिकासाठी ३ वाढीच्या टप्प्यांमध्ये वापरावयाचे उत्पादन ( ग्रेड्स) आहेत.
 • या ग्रेड्स १००% पाण्यात विरघळणाऱ्या असतात आहेत आणि त्यांचा वापर फर्टिगेशनसाठी (ड्रिपमधून) केला जातो.
 • ह्या उत्पादनांचा (ग्रेडसचा) पीएच (pH) कमी आहे आणि ती क्लोराईडमुक्त आहेत.
 • ह्या उत्पादनांचा (ग्रेडसचा) वापर एप्रिल आणि ऑक्टोबर अशा दोन्ही छाटणीच्या वेळेस केला जातो.

एप्रिलचे छाटणीचे वेळापत्रक:

ग्रेडचे नाव ग्रेडमधील घटक पिकामध्ये वापरण्याचा टप्पा वापर करण्याची वेळ
(लागवड केल्यानंतरचे दिवस)
प्रमाण (किलो/एकर)
महाधन ऑल इन वन ग्रेप्स स्पेशल: ग्रेड 2 ६:३४:१७+TE वेलीची शाखीय वाढ व काडीची वाढ १०-६५ ७०
महाधन ऑल इन वन ग्रेप्स स्पेशल: ग्रेड ३ ६:००:३७:१६+TE काडीची वाढ व काडीची पक्वता ६६-९५ ४०

ऑक्टोबरचे छाटणीचे वेळापत्रक:

ग्रेडचे नाव ग्रेडमधील घटक पिकामध्ये वापरण्याचा टप्पा वापर करण्याची वेळ
(लागवड केल्यानंतरचे दिवस)
प्रमाण (किलो/एकर)
महाधन ऑल इन वन ग्रेप्स स्पेशल: ग्रेड १ १५:२८:०६+TE वेलीची शाखीय वाढ व फुलोरा अवस्था ०७-३५ ४०
महाधन ऑल इन वन ग्रेप्स स्पेशल: ग्रेड २ ६:३४:१७+TE मणी सेटिंग व मण्याची वाढ ३६-८५ ६०
महाधन ऑल इन वन ग्रेप्स स्पेशल: ग्रेड ३ ६:००:३७:१६+TE द्राक्षे मण्यांमध्ये पाणी उतरणे व त्यांची काढणी ८६-१२० ४०

 • या ग्रेड्समध्ये द्राक्षाचे पीक आणि द्राक्षे पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसारच्या आवश्यकता प्रमाणे नायट्रोजन (N), फॉस्फरस (P) आणि पोटॅशियम (K), सेकंडरी आणि सूक्ष्म पोषक घटक (मायक्रोन्यूट्रिएंट) आहेत.

 • या ग्रेड्स द्राक्षे पीक आणि द्राक्षे पिकाच्या वाढीच्या टप्यांनुसार वापरण्यासाठी तयार करण्यात आलेले सर्व अन्नद्रव्यांनी युक्त असे एक उत्पादन (सोल्युशन) आहे.
 • या ग्रेड्स द्राक्षे पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार लागणाऱ्या आवश्यक असलेल्या पोषक घटकांच्या सर्व गरजा पूर्ण करतात

एप्रिलच्या छाटणीच्या वेळेस वापरल्याने होणारे फायदे

 • द्राक्षे वेलीची एकसारखी, संतुलित आणि निरोगी वाढ होते
 • काडीची एकसारखी वाढ होते.
 • काडीची जाडी वाढते
 • अधिक डोळ्यांची संख्या आणि दोन डोळ्यातील अंतर कमी
 • काडीची एकसारखी पक्वता
 • गर्भधारणेयोग्य डोळ्यांची संख्या जास्त

ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस वापरल्याने होणारे फायदे

 • वेलीची संतुलित व निरोगी वाढ होते
 • भरपूर फुलोरा
 • घडामध्ये मण्यांची संख्या जास्त मिळते.
 • मण्यांची एकसारखी वाढ होते.
 • मण्यांवरील चमक वाढते.
 • मण्यांमधील टीएसएस प्रमाण (गोडी) वाढते.
 • एक्सपोर्टेबल क्वालिटीसह (निर्यात करण्यायोग्यगुणवत्तेसह) उत्पादनात वाढ (+१५-२०%)

Mahadhan SMARTEK