डाळिंब शेती टिपा

सौम्य हिवाळ्यासह आर्द्र आणि उष्ण हवामान डाळिंबाच्या वाढीसाठी आदर्श असते. २५-३५से दरम्यान तापमान आणि ५००- ८०० मिमी पाऊस असलेल्या प्रदेशात डाळींबाची यशस्वी लागवड केली जाऊ शकते. फळांची वाढ होत असताना उष्ण व कोरडे हवामान असल्यास फळाचा दर्जा सुधारतो.

डाळिंब विविध प्रकारच्या मातीमध्ये येते. तथापि, मध्यम, चिकणमाती आणि सामू ७.५ असलेल्या चांगल्या निचऱ्याच्या मातीमध्ये त्यांची वाढ चांगली होते. चिकट आणि किंचीत विम्लतायुक्त माती त्याला सहन होते. चांगला निचरा नसलेली जड माती लागवडीसाठी अनुरूप नाही.

नांगरणी, कुळवणी, सपाटीकरण करून आणि तण काढून जमिनीची तयारी केली जाते.

५मी X ५मी अंतर राखून, साधारणत एक एकरामध्ये १६० रोपे लावली जातात.

वळण आणि छाटणी ही दोन महत्वाची कामे डाळिंबावर केली जातात. एकेरी खोडावर किंवा अनेक-खोड प्रणालीवर रोपे वळण केली जातात. जमिनीवरील शोषणाऱ्या वनस्पती, पाण्यावरील कोंब, छेदणाऱ्या फांद्या, वाळलेल्या व रोगग्रस्त काटक्या हे काढण्यासाठी आणि झाडाला आकार देण्यासाठी छाटणी आवश्यक असते.

डाळिंब हे फळपीक असल्यामुळे, त्याला पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतात. खताची शिफारस केलेली मात्रा आहे ६००-७०० ग्रॅम नत्र, २००-२५० ग्रॅम स्फुरद, आणि २००-२५० ग्रॅम पालाश /झाड/वर्ष. डाळिंबाच्या या पोषण गरजांची पूर्तता करण्यासाठी, डाळिंबाच्या उत्पादकांनी खत व्यवस्थापन पध्दतींचे नियोजन करून योग्यप्रकारे पालन केले पाहिजे.

नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मॅगनीझ, झिंक, तांबे, आणि बोरॉन.

पोषक तत्वे महाधन उत्पादन
नत्र महाधन सल्फेट (अमोनियम सल्फेट), महाधन कॅल्शियम नायट्रेट
स्फुरद महाधन सुपर
पालाश महाधन पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम स्कोनाईट,
नत्र + स्फुरद महाधन २४:२४:०, महाधन २०:२०:०-१३, महाधन १२:६१:०
नत्र + पालाश महाधन १३:०:४५
नत्र + स्फुरद + पालाश महाधन १२:३२:१६, महाधन १०:२६:२६, महाधन १६:१६:१६, महाधन १९:१९:१९, महाधन १३:४०:१३
कॅल्शिअम महाधन कॅल्शियम नायट्रेट (फिल्ड ग्रेड)
मॅग्नेशियम (मॅग्नेशियम) महाधन मॅग्नीशियम सल्फेट
गंधक महाधन बेनसल्फ, महाधन झिंको बेनसल्फ, महाधन महासल्फ
कॅल्शियम+मॅग्नेशियम+गंधक कॅल्शियम -मॅग्नेशियम- गंधक
लोह महाधन फेरस सल्फेट (जमिनीमधून वापरासाठी), महाधन एफई (चिलेटेड) (ठिबक वापरासाठी)
जस्त (झिंक) महाधन झिंक सल्फेट २१% आणि ३३% (मातीतील वापरासाठी), महाधन झिंक (चिलेटेड)
मँगेनीझ महाधन कॉम्बी
तांबे (कॉपर) महाधन कॉम्बी
बोरॉन महाधन डीओटी आणि डीटीबी

डाळिंब उत्पादकांना जमिनीमध्ये तसेच ठिबक प्रणालीद्वारे वापरता येतील अशी अनेक खते दीपक फर्टिलायझर्स देते. डाळिंब उत्पादकांनी खालील वेळापत्रकांचे पालन करावे:

डाळिंब उत्पादकांसाठी (जमिनीतून देण्यासाठी) शिफारस केलेले खत वेळापत्रक (तक्ता १):

 

डाळिंब पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे देण्यासाठीचे खत वेळापत्रक (तक्ता क्रमांक २):

 

(Or)

 

डाळिंबाच्या लागवडीसाठी फवारणीद्वारे वापरावयाचे वेळापत्रक (तक्ता ३):

फुले गळू नयेत आणि फळाला तडे जाऊ नयेत यासाठी, फुले येण्यापासून ते काढणीपर्यंत नियमीत सिंचन आवश्यक आहे. डाळिंबाची झाडे दुष्काळाची स्थिती सहन करू शकतात परंतु भरपूर उत्पादनासाठी सिंचन आवश्यक असते. ठिबक सिंचनाने आणि मातीच्या आदर्श स्थितींमध्ये डाळिंबाला दरवर्षी हेक्टरी ६५० मिमी पाणी लागते.

बिन-निवडक कोणतेही तणनाशक जसे की ग्लायफोसेट १०मिली/लि ग्रॅम/लि याप्रमाणे किंवा पॅराक्वॅट १० मिली/लि याप्रमाणात झाडांच्या मध्ये हातात धरण्याच्या फवारणी यंत्राद्वारे, फवारा डाळिंबाच्या पानांवर वाहून जाणार नाही याची काळजी घेऊन फवारले जाते.

  1. डाळिंबाच्या फुलपाखराचे व्यवस्थापन
    • सर्व प्रभावित फळे काढणे आणि नष्ट करणे (बाहेर पडणारी भोके असलेली फळे)
    • फुलपाखरांच्या हालचालींच्या वेळी ३ % कडुलिंबाचे तेल किंवा ५% एनएसकेई फवारा. आवश्यक असल्यास १५ दिवसांच्या मध्यांतराने पुन्हा फवारणी करा.
    • ५०% हून जास्त फळे तयार झाली असतील अशा स्थितीला डिकामेथ्रिन ०.००२८% आणि दोन आठवड्यांनंतर कार्बारील ०.२% किंवा फेनवालेरेट ०.००५% फवारावे.
  2. पिठ्या ढेकुण नियंत्रण
    • प्रादुर्भाव झालेले खोड व लहान फांद्या काढून टाका.
    • मोनोक्रोटोफॉस (०.१%) किंवा क्लोरपायरीफॉस (०.०२%) किंवा डायक्लोरोवोस (०.०५%) फवारा.
  1. जिवाणूजन्य पान आणि तेलकट डागांच्या रोगाचे व्यवस्थापन
    • रोगमुक्त रोपण साहित्य निवडणे
    • पान फुटायला सुरुवात होण्याच्या स्थितीपासून १५ दिवसांच्या मध्यांतराने ५-६ वेळा कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२५%) किंवा कार्बेन्डाझिम (०.१५%) सह स्ट्रेप्टोसायक्लाईनची (०.०२५%) फवारणी करणे.
    • पडलेल्या काड्या, पाने व फळे बागेच्या आवाराबाहेर नष्ट करावी.
  2. पानांवरील आणि फळांवरील ठिपक्यांच्या रोगाचे व्यवस्थापन
    • प्रादुर्भाव झालेली फळे गोळा करून नष्ट करावी.
    • फळे तोडण्यापूर्वी पिकावर कार्बेन्डाझिम (०.१५%) किंवा मॅन्कोझेब (०.२५%) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईडची (०.२५%) फवारणी करावी.
  3. फळ सड नियंत्रण
    • सर्व प्रभावित फळे गोळा करून नष्ट करावी.
    • रोग नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी कार्बेन्डाझिम (०.१५%) किंवा मॅन्कोझेब (०.२५%) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईडची (०.२५%) पिकावर फवारणी करावी.

टिप: एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासाठी, डाळींब राष्ट्रीय संशोधन केंद्राने पानांवरील फवारण्यांसाठीचे एक वेळापत्रक तयार केले असून त्याची शिफारस केली जाते. त्याचे अनुसरण करावे.

वजन, आकारमान आणि रंगानुसार फळांची प्रतवारी केली जाते. शीतगृहामध्ये २ महिन्यापर्यंत किंवा ५ ० सें. ला १० आठवड्यांपर्यंत फळे ठेवता येतात. थंडाव्यामुळे होणारी इजा आणि वजनाचे नुकसान टाळण्यासाठी अधिक दीर्घकाळ संग्रहण १० ० से. आणि ९५% आर्द्रतेवर करावे.

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK