ऊस शेती टिपा

हवामान आणि माती

हवामान आणि माती

 

पूर्वं मशागत

पूर्वं मशागत

 

बेणे प्रमाण आणि अंतर

बेणे प्रमाण आणि अंतर

 

आंतरमशागत

आंतरमशागत

 

पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

 

सिंचन व्यवस्थापन

सिंचन व्यवस्थापन

 

तण नियंत्रण

तण नियंत्रण

 

कीड नियंत्रण

कीड नियंत्रण

 

रोग नियंत्रण

रोग नियंत्रण

 

काढणी व काढणीपश्चात उपाययोजना

काढणी व काढणीपश्चात उपाययोजना

 

उष्णकटिबंधीय भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागांमध्ये ऊसाचे पीक भरपूर येते. ऊसासाठी आदर्श हवामान म्हणजे सौर विकिरणाचे मोठे प्रमाण असलेला वाढीचा दीर्घ उष्ण हंगाम आणि जमिनीत पुरेशी आर्द्रता. भरपूर पाऊस किंवा चांगले सिंचन असलेला भाग ऊसाच्या लागवडीसाठी उत्तम असतो.

उसाच्या लागवडीसाठी जमीन भारी अथवा मध्यम मगदूराची असावी. तथापि, चांगला निचरा असलेली, खोल, हलकी रेताड, कमी किंवा भारी पोयट्याची जमिन ऊसाच्या लागवडीसाठी उत्तम असते.

माती चांगली खुरपली जाण्यासाठी ट्रॅक्टरने जोडली जाणारी विविध अवजारे वापरून जमीन नांगरावी व सऱ्या आणि वरंबे तयार करावे.

1 एकर जमिनीवर लागवड करण्यासाठी जोडीच्या रांगेतील रोपणामध्ये, 24,000 (2-डोळ्यांची टिपरी) किंवा 16,000 (3-डोळ्यांची टिपरी) आवश्यक असतात. दोन ओळींतील अंतर मातीच्या पोतानुसार 90 सेमी ते 120 सेमी असते.

सरींमधील माती खुरपली जावी आणि तण काढले जावे यासाठी शेतकरी नियमीतपणे आंतर मशागतीची कामे करत असतात. ऊसाचे पीक 3-4 महिन्यांचे झाले की जोमाने वाढू लागते तेव्हा पिकाच्या रांगाना मातीची भर लावली जाते. किडीचा हल्ला टाळण्यासाठी जुनी पाने काढून टाकली जातात. ऊसाची रोपे वाढत असताना उन्मळून पडू नयेत म्हणून ती बांधली जातात.

ऊसाच्या पोषणाच्या आवश्यकतांनुसार त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. चांगला  साखर उतारा आणि पिकाची वाढ होऊन भरपूर उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक प्रमाणात मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये वापरणे आवश्यक आहे. ऊस लागवडीमध्ये अनेकदा नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, मॅग्नेशियम, जस्त आणि बोरॉनची कमतरता आढळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य खते वापरून ही पोषक तत्वे योग्य प्रमाणात दिली जाणे महत्वाचे आहे.

जमिनीतून वापरण्यासाठी खतांची शिफारस (तक्ता 1):

 

ठिबक सिंचांनाद्वारे देण्यात येणाऱ्या खतांचे वेळापत्रक (तक्ता 2):

 

फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांची शिफारस (तक्ता 3):

ऊस पिकाच्या विविध अवस्थांमध्ये नियमीत सिंचन लागते. सुरुवातीच्या स्थितीला 2 ते 3 सेमी खोलीपर्यंत पाणी सोडून जमीन उथळ भिजवा. नंतरच्या फुटव्याच्या, जोमदार वाढीच्या आणि तयार होण्याच्या टप्प्यांमध्ये सिंचनातील अंतर ही सुरुवातीच्या प्रारंभीच्या स्थितीहून थोडी जास्त (8-10 दिवस) असली तरी चालतात.

खताच्या पोषक घटकांच्या द्रावणासह (फर्टिगेशन) ऊसाच्या पिकाला ठिबक प्रणालीने सिंचन दिल्यास पिकाच्या पाण्याच्या तसेच पोषक घटकांच्या आवश्यकतांची एकत्रितपणे पूर्तता होते.

ऊसाच्या पिकाच्या सरींमध्ये तणाचाही प्रादुभावि होतो, खास करून पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये. ऊसाच्या पिकामध्ये बहुतांश उंच वाढणारे तण दिसून येतात.

 • लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी वरंब्यांमध्ये खुरपणी करण्यासह नियमितपणे आंतरमशागतीची कामे करावी
 • अट्राझाईन 0.8 किग्रॅ/एकर किंवा ऑक्सीफ्लुरोफेन 300 मिली/एकर 600 लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी उगवणीपूर्व तणनाशक म्हणून फवारावे
 • उगवण झाल्यानंतर 1 लि/एकर या प्रमाणात ग्लायफोसेट आणि 2% अमोनियम सल्फेट किंवा 2,4-डी सोडियम साल्ट 1 किग्रॅ/एकर या प्रमाणात 600 लिटर पाण्यात मिसळून थेट फवारणी करावी
 • जर परजिवी प्रकारच्या तणाची समस्या असेल तर, तण उगवल्यावर 2,4-डी सोडियम साल्ट 1 किग्रॅ/हेक्टरला 500 लिटर पाणी/हेक्टर या प्रमाणात वापरले जाऊ शकते.
 1. कीड प्रतिरोधक  शेंडे पोखरणारी अळी नियंत्रण
  • अवरोधक जाती वापराव्या आणि उसामध्ये हिरवळीच्या पिकाची आंतरशेती करावी
  • वरंब्यांच्या शेजारी 10-15 सेमी जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यावा
  • शेंडे काढणे आणि नष्ट करणे. हेक्टरला 10 याप्रमाणे फेरोमोन सापळे लावावे
  • कार्बोरील +सेविडॉल 4% जी 12.5 किग्रॅ/हे, कार्बोफ्युरॉन 3जी 33 किग्रॅ/हे चा मातीत वापर करावा किंवा क्लोरपायरीफोस 1000 मिली/हे ची पिकांवर फवारणी करावी
 2. हुमणी व्यवस्थापन
  • पुरेसे सिंचन करावे.
  • कापणीनंतर त्वरीत खोल नांगरणी करावी.
  • शेतामध्ये 24 तास पाणी साठवून ठेवल्यामुळे हुमणी मातीतून बाहेर येते.
  • प्रौढ भुंगेरे गोळा करून नष्ट करावे
 3. लोकरी मावा व्यवस्थापन
  • जोड रांग लागवड प्रणालीचा वापर.
  • सर्व रांगांच्या बाजूने ऊस गुंडाळावा.
  • लागवडीपूर्वी बेणे संच क्लोरपायरिफॉस 20 ईसी द्रावणात (2 मिली/लि) बुडवावे.
  • मातीमध्ये फोरेट 10 जी 5किग्रॅ/एकर किंवा फवारणीद्वारे ऍसेफेट 75 एसपी किग्रॅ/लि किंवा क्लोरपायरिफॉस 20 ईसी 2 मिली/लि किंवा ऑक्सीडेमेटॉन मिथेल 25 ईसी 1.3 मिली/लि या प्रमाणात द्यावे.

बुरशी,जिवाणू व विषाणूंमुळे ऊसाच्या पिकावर रोग पडू शकतात. ऊसाच्या पिकावरील काही रोग आणि त्यांच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना खाली सूचीबद्ध केल्या आहेत.

 1. लाल कुजव्या नियंत्रण
  • बेणे संच अगल्लोल किंवा अरेटानच्या 0.25% द्रावणात 2-3 मिनिटे बुडवावा
  • संक्रमण झालेली रोपे उपटून जाळून टाकावी
 2. चाबूक कानी नियंत्रण
  • प्रतिरोधक जातींची लागवड.
  • रोपाचा शेंडा काळजीपूर्वक असा खुडावा की त्यातील बिजाणू पसरणार नाहीत आणि संक्रमण झालेल्या उपटलेल्या रोपांसह जाळून टाकावा.
 3. मर रोग नियंत्रण
  • प्रतिरोधक जातींची लागवड.
  • संक्रमण झालेली रोपे उपटून जाळून टाकावी
 • काढणी 10 ते 11 महिन्यांच्या वयात करावी
 • मधल्या हंगामाच्या जातींची काढणी 11 ते 12 महिन्यांच्या वयात करावी
 • ऊस चांगला तयार झालेला असताना काढावा.
 • वनस्पती आणि खोडवा अशा दोन्ही पिकांसाठी ऊस जमिनीच्या पातळीला कापावा.
Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App