केळी शेती टिपा

हवामान आणि माती

हवामान आणि माती

जमिनीची तयारी

जमिनीची तयारी

बियांचे प्रमाण आणि अंतर

बियांचे प्रमाण आणि अंतर

आंतरमशागत

आंतरमशागत

केळी पिकांतील अन्नद्रव्य व्यवस्थापन

केळी पिकांतील अन्नद्रव्य व्यवस्थापन

केळीच्या लागवडीसाठी कोणते पोषक घटक आवश्यक असतात?

केळीच्या लागवडीसाठी कोणते पोषक घटक आवश्यक असतात?

डीएफपीसीएलची कोणती महाधन खते केळीच्या बागेच्या ह्या पोषणाच्या गरजा भागवतात?

डीएफपीसीएलची कोणती महाधन खते केळीच्या बागेच्या ह्या पोषणाच्या गरजा भागवतात?

केळीचे जास्त उत्पन्न आणि फळाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी महाधन खते उत्पादने कधी, कशी आणि किती वापरावी?

केळीचे जास्त उत्पन्न आणि फळाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी महाधन खते उत्पादने कधी, कशी आणि किती वापरावी?

सिंचन व्यवस्थापन

सिंचन व्यवस्थापन

तण नियंत्रण

तण नियंत्रण

किड नियंत्रण

किड नियंत्रण

 

रोग नियंत्रण

रोग नियंत्रण

 

काढणी व काढणी पश्चात काळजी

काढणी व काढणी पश्चात काळजी

 

केळी हे एक उष्ण कटिबंधात येणारे नगदी पीक आहे ज्यासाठी उबदार आणि दमट हवामान लागते. थंड हवामानामधे पीक तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याच्या समाधानकारक वाढीसाठी वर्षभरात १७०० मि.मि. पावसाची गरज असते. पाणी साठून राहणे घातक आहे आणि त्यामुळे पनामा विल्टसारखे रोग होऊ शकतात.
केळी लागवडीसाठी चांगला निचरा होणारी आणि पोयटा जमीन योग्य असते. अल्कधर्मी आणि क्षारयुक्त जमीन टाळावी. केळीच्या लागवडीसाठी मातीच्या सामूची कमाल मर्यादा ६.५ – ७.५ आहे.
केळीची लागवड करण्याआधी हिरवळ, चवळी घ्यावी. जमीन २-४ वेळा नांगरावी आणि सपाट करावी. ढेकळे फोडून माती एकसारखी करण्यासाठी रोटावेटर किंवा नांगर वापरला जातो.
१.५ X १.५ मी. ह्या अंतराने लागवड केली तर एका एकरमधे १७७७ झाडे मावतात. परंतु, जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी १.२ X १.५ मी. ह्या अंतराचा वापर केला जाऊ शकतो. खड्याच्या मध्यभागी गड्डे लावावे आणि त्याभोवती माती दाबून बसवावी. खोल लागवड टाळावी. लागवड केल्यावर लगेच शेतात सिंचन करावे.
तण आटोक्यात ठेवण्यासाठी सामान्यपणे फावडे वापरले जाते आणि साधारणपणे वर्षातून चार वेळा फावड्याने जमीन खोदणे त्यासाठी प्रभावी ठरते. नको असलेले कोंब काढणे हे केळी लागवडीमधील एक अत्यंत महत्वाचे काम आहे. नांगरणीने पेरणी करताना पाणी साचणे टाळण्यासाठी जमिनीची तयारी पावसाळ्यामध्ये करावी. जोरात वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेळी झाडे उन्मळून पडू नयेत यासाठी आधार देणे हे देखील खूप महत्वाचे आहे. अतिरिक्त पाने छाटल्याने जुन्या पानांद्वारे रोग पसरणे कमी करण्यास मदत होऊ शकते. थंडी, कडक उन, फुलकिड्यांचा हल्ला, ठिपके पडणाऱ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव यांपासून घडाचे संरक्षण करण्यासाठी वापरले जाणारे बॅगिंग (घड झाकणे) ही आणखी एक केळी लागवडीची आधुनिक पद्धत आहे.
केळी हे पानांच्या भरपूर वाढीची गरज असणारे एक फळ पीक असल्यामुळे, त्याला तुलनेने जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये लागतात.
नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मॅंगेनीज, झिंक (जस्त), कॉपर (तांबे) आणि बोरॉन.
पोषण घटक महाधन उत्पादन
नत्र महाधन सल्फेट (अमोनियम सल्फेट), महाधन कॅल्शियम नायट्रेट
स्फुरद महाधन सुपर
पालाश महाधन पोटॅश, महाधन सल्फेट ऑफ पोटॅश, महाधन पोटॅशियम शोनाईट
नत्र + स्फुरद महाधन २४:२४:०. महाधन २०:२०:०:१३, महाधन १२:६१:०
नत्र + पालाश महाधन १३:०:४५
नत्र + स्फुरद + पालाश महाधन १२:३२:१६ महाधन १०:२६:२६, महाधन १६:१६:१६, महाधन १९:१९:१९, महाधन १३:४०:१३
कॅल्शियम महाधन कॅल्शियम नायट्रेट (फिल्ड ग्रेड)
मॅग्नेशियम महाधन मॅग्नीशियम सल्फेट
गंधक महाधन बेनसल्फ, महाधन झिंको बेनसल्फ, महाधन महासल्फ
कॅल्शियम + मॅग्नेशियम + गंधक कॅल्शियम – मॅग्नेशियम – गंधक
आयर्न महाधन फेरस सल्फेट (जमिनीमध्ये वापरण्यासाठी), महाधन फेरस (चिलेटेड)
झिंक महाधन झिंक सल्फेट २१% आणि ३३% (जमिनीमध्ये वापरण्यासाठी), महाधन झिंक (चिलेटेड)
मॅंगेनीज महाधन कॉम्बी
कॉपर महाधन कॉम्बी
बोरॉन महाधन बोरॉन डीओटी आणि डीटीबी

केळी उत्पादकांना जमिनीतून वापरण्यासाठी आणि ठिबक प्रणालीमधूनही वापरता येतील अशी अनेक खत उत्पादने स्मार्टकेम टेकनॉलॉजिएस पुरवितात.

ठिबक सिंचन सोयीसुविधांशिवाय केळीच्या हंगामासाठी शिफारस केलेले खत वेळापत्रक खाली दिले आहे (तक्ता १):

 

ठिबक सिंचन असलेल्या केळी उत्पादकांसाठी शिफारस केलेले खताचे वेळापत्रक (तक्ता २):

 

 

(Or)

 

केळीच्या बागेसाठी फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांची शिफारस(तक्ता ३):

केळीच्या अधिक उत्पादनासाठी जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते . रोप लावल्यानंतर लगेच सिंचन करावे . ४ दिवसानंतर जीवदान देणारे सिंचन द्यावे आणि बागेच्या जमिनीत येणाऱ्या केळांना त्यानंतर आठवड्यातून एकदा सिंचन द्यावे . खतांच्या प्रत्येक वापरानंतर शेत भरपूर प्रमाणात नांगरा. लागवडीपासून चौथ्या महिन्यापर्यंत ५-१० लि./रोप/दिवस या प्रमाणात ठिबक सिंचन वापरा, पाचव्या महिन्यापासून ते पाने फुटायला लागेपर्यंत १०-१५ लि./रोप/दिवस आणि पाने फुटल्यापासून सुगीच्या १५ दिवसांपर्यंत १५ लि./रोप/दिवस असे सिंचन करावे.
ग्लायफोसेट सारखे बिन-निवडक , उगवणी पश्चात तणनाशक १.० लि./एकर या प्रमाणात रोपांच्या मध्ये वापरण्याची शिफारस केली जाते. रोपाभोवती केलेल्या आळ्यामधे अजिबात फवारणी करू नये.
 1. सोंडे किड नियंत्रण
  • मातीमध्ये खोडाभोवती कार्बोफ्युरन ग्रॅन्युल्स १०-२० ग्रॅ/रोप या प्रमाणात वापरावे.
 2. खोड किड नियंत्रण
  • वाळलेली पाने वेळोवेळी काढा आणि लागवड स्वच्छ ठेवा. प्रत्येक महिन्यात कोंबांची छाटणी करा.
  • कार्बोफ्युरन ३G प्रत्येक रोपासाठी १० ग्रॅ या प्रमाणात वापरणे.
  • बाधित गोष्टी खतांच्या खड्डयामध्ये पुरू नका. बाधित झाडे उपटून त्याचे तुकडे करून जाळून टाकावी.
 3. केळ्यावरील माव्याचे नियंत्रण
  • फॉस्फामिडॉन २ मि./लि. किंवा मिथाइल डेमेटॉन २ मिली./लि. किंवा अॅसेफेट १.५ ग्रॅ किंवा अॅसेटामिप्रिड ०.४ ग्रॅ / लि. यांसारखी कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्यामुळे मावा नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
 4. सूत्रकृमींचे नियंत्रण
  •  रोप लावल्यानंतर एका महिन्याने प्रत्येक रोपाभोवती ४० ग्रॅ कार्बोफ्युरन जमिनीत द्यावे.
 1. सिगटोका लीफ स्पॉटचे नियंत्रण
  • रोगर पाने काढा आणि जाळून टाका. कार्बेन्डॅझिम १ ग्रॅम / लि., मँकोझेब २ ग्रॅम / लि., कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम / लि. यापैकी कोणत्याही बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • थायोफिनाइट मिथाइल ४०० ग्रॅ/एकर + जवसाचे तेल २% किंवा क्लोरोथालोनील ४०० ग्रॅ/एकर याची फवारणी करावी.
 2. पानावरील ठिपके रोगाचे नियंत्रण
  • कॉपर ऑक्सिक्लोराइड ०.२५% किंवा बोर्डेक्स मिश्रण १% किंवा क्लोरोथॅलोनिल ०.२% किंवा कार्बेन्डॅझिम ०.१% ची फवारणी करावी.
  • कापणीनंतर फळे कार्बेन्डॅझिम ४०० पीपीएम मध्ये बूडवावेत.
 3. केळीच्या पर्णगुच्छ रोगाचे नियंत्रण
  • केळ्यावरील मावा हा केळीच्या पर्णगुच्छ रोगाचा रोगवाहक आहे. तो आटोक्यात ठेवण्यासाठी फॉसफॅमिडॉन १ मिलि./लि. किंवा मिथाइल डेमेटॉन २ मिलि./लि. किंवा मोनोक्रोटोफॉस १ मिलि./लि. ची फवारणी करा. २१ दिवसाच्या अंतराने किमान तीन वेळा घेर आणि खोडाच्या दिशेने जमिनीच्या पातळीवर फवारणी करावी.
  • विषाणु-मुक्त गड्डे वापरा आणि बागेमधील विषाणु-बाधित रोपांचा नाश करा.
 4. पनामा रोगाचे नियंत्रण
  • खूप बाधित झालेली रोपे उपटून टाका आणि त्यांचा नाश करा.
  • बाधित रोपे काढल्यानंतर खड्डयांमधे १ – २ कि. चुना घाला.
 5. फ्युजेरीयम विल्टचे नियंत्रण
  • बाधित रोपे काढावी व प्रत्येक खड्ड्यात १ – २ कि. चुना घालावा.
  • कार्बेन्डॅझिम कॅप्सुल वापरणे किंवा पेरणीनंतर २ऱ्या, ४थ्या आणि ६व्या महिन्यामधे पी.फ्लुरोसेंस ६० मि.ग्रॅ/ कॅप्सुल/झाड या प्रमाणात वापरावे. कंदामधे १० से.मी. खोल छिद्र पाडून कॅप्सुल वापरावी.
  • २% कार्बेन्डॅझिमचे कंदामधे ३ मि.लि. इंजेक्शन द्यावे.
  • ०.१ % कार्बेन्डॅझिमने जमीन भिजवावी.
जात, माती, हवामानाची स्थिती आणि लागवडीनुसार फुले आल्यानंतर १०० ते १५० दिवसात घड तयार होतात. केळी काढणीच्या बरेच दिवस आधी सिंचन थांबवावे.
Mahadhan SMARTEK