भुईमूग शेती टिपा

तापमान आणि पाऊस यांसारख्या हवामानाच्या स्थितींचा भुईमूगाच्या पिकाच्या उत्पादनावर ठळकपणे परिणाम होतो. तापमान हा एक प्रमुख पर्यावरणीय घटक आहे जो पिकाच्या विकासाचा दर ठरवतो. जास्तीत जास्त उत्पन्न आणि भुईमूगाच्या दर्जासाठी वाढीच्या हंगामामध्ये, खास करून फुले येणे, पेगिंग आणि शेंगा तयार होण्याच्या स्थितीमध्ये, पुरेसा आणि योग्य आऱ्या एकसारखा पाऊस आवश्यक आहे. 600 ते 1500 मिमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रांमध्ये भुईमूग घेतला जातो.
चांगला निचरा असलेल्या वालुकामय चिकणमातीत किंवा पोयटायुक्त मातीमध्ये भुईमूग चांगला येतो. सखोल चांगला निचरा असलेली, सामू 6.5 ते 7.0 असलेली, सुपिक जमीन भुईमूगाच्या उत्पादनासाठी आदर्श आहे.
शेताची वेळेत तयारी केल्यास वेळेत पेरणी होऊन चांगले उत्पादन मिळते.
जमिनीची तयारी करताना पिकाचे राहिलेले अवशेष, आगंतुक पिके आणि तणे पूर्णपणे गाडली जातात. उन्हाळ्यात नांगरणी करणे फायदेशीर असते, कारण तणांच्या बिया, सुप्तावस्थेतील कीटक आणि रोगास कारणीभूत जिवाणू उन्हाळ्यातील उन्हाला उघड पडून मरतात.
गुच्छ प्रकारच्या जातींसाठी 32 – 40 किग्रॅ/एकर या प्रमाणात बियाणे  आणि पसरणाऱ्या प्रकारांसाठी 24 – 32 किग्रॅ/एकर या प्रमाणात वापरले जाते. नांगरामागे साधारण 5 सेंटिमीटर खोल किंवा टोकण किंवा पेरणी यंत्राच्या मदतीने पेरणी केली जावी. ओळींतील अंतर झुपकेदार प्रकारात 30-40 सेमी आणि पसाऱ्या प्रकारांसाठी 45-60 सेमी अंतर असावे. रोपांतील अंतर गुच्छ आणि पसरणाऱ्या प्रकारांसाठी अनुक्रमे 15 आणि 20 सेंटिमीटरचे असावे.
तणे नियंत्रित करण्यासाठी आणि माती भुसभुशीत ठेवण्यासाठी पहिल्या 1 किंवा 2 महिन्यांमध्ये एक किंवा दोन खुरपणी केली जाते.
भुईमूगाचे शेतकरी सहसा भुईमूगासाठी नत्र, स्फुरद, पालाश खते वापरतात. तथापि, दुय्यम आणि सूक्ष्मपोषकांच्या वापरामुळे मातीतील पिकाच्या पोषणविषयक गरजांची पूर्तता अधिक चांगली होऊन भुईमूग पिकाच्या उत्पन्नाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, असे आढळून आले आहे. त्यानुसार, माती आणि फवारणीतून द्यावयाचे खताचे वेळापत्रक खाली दिले आहे:
नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, लोह, मॅगनीझ, झिंक, कॉपर, आणि बोरॉन.
पोषक तत्वे महाधन उत्पादन
नत्र महाधन सल्फेट (अमोनियम सल्फेट), महाधन कॅल्शियम नायट्रेट
स्फुरद महाधन सुपर
पालाश महाधन पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम स्कोनाईट,
नत्र + स्फुरद महाधन 24:24:0, महाधन 20:20:0-13, महाधन 12:61:0
नत्र + पालाश महाधन 13:0:45
नत्र + स्फुरद + पालाश महाधन 12:32:16, महाधन 10:26:26, महाधन 16:16:16, महाधन 19:19:19, महाधन 13:40:13
कॅल्शिअम महाधन कॅल्शियम नायट्रेट (फिल्ड ग्रेड)
मॅग्नेशियम (मॅग्नेशियम) महाधन मॅग्नीशियम सल्फेट
गंधक महाधन बेनसल्फ, महाधन झिंको बेनसल्फ, महाधन महासल्फ
कॅल्शिअम + मॅग्नेशियम + गंधक कॅल्शियम – मॅग्नेशियम – गंधक
लोह महाधन एफई (चिलेटेड), महाधन फेरौस सल्फेट
झिंक महाधन झिंक सल्फेट (जमिनीतील वापरासाठी) 21% आणि 33%, महाधन झिंक (चिलेटेड)
मॅन्गेनीज महाधन कॉम्बी
तांबे (कॉपर) महाधन कॉम्बी
बोरॉन महाधन बोरॉन डीओटी आणि डीटीबी

भुईमूग उत्पादकांना थेट जमिनीमध्ये तसेच ठिबक प्रणालीद्वारे वापरता येतील अशी अनेक खते दीपक फर्टिलायझर्स देते. फवारणीद्वारे शेतकऱ्यांना वापरता येतील अशीही खते आहेत.

भुईमूगाच्या शेतकऱ्यांसाठी खताचे वेळापत्रक :

 

भुईमूगाच्या पिकासाठी फवारणीद्वारे द्यावयाच्या खताची शिफारस :

पेगिंग, फुले येणे आणि शेंगा तयार होण्याच्या स्थिती सिंचनासाठी महत्वाच्या असतात या कालावधीमध्ये मातीत पुरेसा ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते.

भुईमूग हे प्रामुख्याने हलक्या मातीमध्ये घेतले जाणारे पीक आहे यामध्ये तणांचा उपद्रव प्रत्येक प्रदेशानुसार बदलतो. वाळूच्या जमिनीमध्ये, रूंद पानांच्या तुलनेत गवताळ तणाचा प्रादुर्भाव जास्त असतो तर लाल मातीमध्ये गवताळ तणाच्या तुलनेत रुंद पानांची तणे ही मुख्य समस्या असते.

  • पेरणीपूर्वी मातीमध्ये फ्लुक्लोरालिन 0.8 लि/एकर किंवा उगवण झाल्यावर फ्लुक्लोरालिन 0.8 लि/एकर किंवा पेरणीनंतर तिसऱ्या दिवशी पेंडिमेथालिन 3.3 लि/हेक्टर या प्रमाणात वापरावे.
  • तणाच्या घनतेनुसार पेरणीनंतर 20-30 दिवस इमाझेथापीर 300 मिली/एकर या प्रमाणात उगवणीपश्चात फवारणी म्हणून वापरावे.
  • पिकाच्या नंतरच्या स्थितीला तण असतील तर कोणतेही उगवणीपश्चात तणनाशके जसे की (असिफ्लुर्फेन 16.5% + सोडियम क्लाडिनोफॉप 88%) ईसी 400मिली/एकर किंवा (इमाझातापीर 3.75% + प्रोपाक्विझाफॉप 2.5%) 800 मिली/एकर किंवा (फोमासाफेन + क्विझालोफोप) ईसी 400 मिली/एकर वापरले जावे.
  1. शेंग अळीचे व्यवस्थापन
    • उन्हाळ्यातील सखोल नांगरणी आणि भुईमूगाच्या दर 5 किंवा 6 ओळींनंतर एक ओळ हरभऱ्याचे आंतरपीक
    • हेक्टरला 5 या प्रमाणात फेरोमोन सापळे लावावे
    • क्विनालफॉस 2लि/लिटर पाण्यात किंवा क्लोरोपायरिफॉस 3लि/लिटर पाण्यात किंवा रेनाक्सीपीर 185 एससी 60 मिली/एकर किंवा फ्लुबेन्डामाईड 480 एससी 40 मिली/एकर किंवा नोवालुरॉन 10% ईसी 250 मिली/एकर किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी 50 ग्रॅ/एकर किंवा (नोवालुरॉन + इंडोक्साकार्ब) एससी 350 मिली/एकर याप्रमाणात फवारणी करावी.
  2. पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
    • सूचक किंवा सापळा पीक म्हणून भुईमूगाच्या शेताच्या कडेने किंवा आंतरपीक म्हणून एरंड लावा
    • एकगठ्ठा अंडी गोळा करून नष्ट करा
    • अळ्यांच्या प्रारंभिक विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी (1ली किंवा 3री स्थिती) कार्बारील 50 डब्ल्यूपी 2.0 किग्रॅ/हेक्टर किंवा क्विनाल्फॉस 25 ईसी 750 मिली/हेक्टर किंवा रेनाक्सीपीर 185 एससी 60 मिली/एकर किंवा फ्लुबेन्डामाईड 480 एससी 40 मिली/एकर किंवा नोवालुरॉन 10% ईसी 250 मिली/एकर किंवा इमामेक्टिन बेन्झोट 5% एसजी 50 ग्रॅ/एकर किंवा (नोवालुरॉन + इंडोक्साकार्ब) एससी 350 मिली/एकर याप्रमाणात फवारणी करावी.
  1. तांबेरा व्यवस्थापन
    मॅन्कोझेब 0.4 किग्रॅ/एकर किंवा क्लोरोथालोनिल 0.4 किग्रॅ/एकर किंवा सल्फर 1 किग्रॅ /एकर किंवा ट्रिडेमोर्फ 200 मिली/एकर
  2. कोवळ्या पानांवरील ठिपक्यांच्या रोगाचे व्यवस्थापन
    कार्बेन्डाझिम 200 ग्रॅ/एकर किंवा मॅन्कोझेब 0.4 किग्रॅ/एकर किंवा क्लोरोथालोनिल 0.4 किग्रॅ/एकरची फवारणी करावी

शेंगा तयार झाल्यावर, जुनी पाने गळून पडतात आणि टोकाची पाने पिवळी पडतात. अधली मधली कोणतीही रोपे उपटून शेंगा सोलून पाहा. जर आतील टरफल तपकिरी काळपट असेल आणि पांढरे नसेल तर पीक तयार झाले आहे. माती कोरडी असेल तर, काढणीपूर्वी सिंचन करा, त्यामुळे काढणी सोपी होईल.

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK