टोमॅटो शेती टिपा

हवामान आणि माती

हवामान आणि माती

 

पूर्वं मशागत

पूर्वं मशागत

 

बियाणाचे प्रमाण आणि अंतर

बियाणाचे प्रमाण आणि अंतर

 

आंतर मशागत

आंतर मशागत

 

पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

 

सिंचन व्यवस्थापन

सिंचन व्यवस्थापन

 

तण नियंत्रण

तण नियंत्रण

 

कीड व त्यांचे व्यवस्थापन

कीड व त्यांचे व्यवस्थापन

 

टोमॅटोवरील रोग आणि त्याचे नियंत्रण

टोमॅटोवरील रोग आणि त्याचे नियंत्रण

 

काढणी आणि काढणीपश्यात उपाययोजना

काढणी आणि काढणीपश्यात उपाययोजना

 

टोमॅटो हे उष्ण हंगामातील पीक आहे. बी रुजण्यासाठी अनुकूल तापमान 26 ते 32 से. लागते. चांगला निचरा होणारी,सेंद्रीय पदार्थयुक्त, 6.5-7.5 सामू  श्रेणी असणारी गाळाची जमीन योग्य आहे.

जमीन चांगली खोलवर नांगरा. 90 /एकर  या प्रमाणात शेणखत टाकून शेत नांगरा आणि 60 सेमी. चे अंतर ठेवून सरीववरंबे तयार करा. 50 किग्रॅ. शेणखतामध्ये 800 ग्रॅम/एकर अझोस्पिरीलम आणि 800 ग्रॅम/एकर फॉस्फोबॅक्टेरीया मिसळून वापरा.

पिकाची जात / संकर यावर आधारित अंतरठेवण्याच्या दोनप्रकारच्या पद्धती साधारणपणे वापरल्या जातात: 1) 60X 45 सेमी आणि 2) 45X30 सेमी. जातींसाठी 160-200 ग्रॅम/ एकर आणि संकरीत जातींसाठी 60-80 ग्रॅ/ एकर बियाण्याचे प्रमाण असावे.

25 मायक्रॉन जाडीच्या काळ्या एलडीपीइ प्लास्टीफने आवरण घाला आणि दोन्ही टोके 10 सेमी खोल मातीत पुरावी.

जमिनीतून देण्यात येणारी खते :

 

Fertigation schedule in tomato cultivation :

 

टोमॅटो पिकासाठी फवारणीद्वारे देण्यात येणार्याी खताचे शिफारस केलेले वेळापत्रक :

सरीमध्ये सिंचन करा आणि 25 दिवसांची रोपे सरींच्या कडेने लावा. लागवड केल्यानंतर 3 दिवसांनी सिंचन करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात, दर 5-7 दिवसांनी, तर हिवाळ्यात 10-15 दिवसांच्या अंतराने सिंचन पुरेसे आहे.

टोमॅटोच्या रोप वाटिकेमध्ये तसेच मुख्य शेतामध्ये रोपण केल्यानंतर तणाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

टोमॅटोची लागवड केल्यानंतर 1-3 दिवसांनी उगवणीपूर्व तणनाशक पेन्डी मेथालीन 1.0 किग्रॅए.आय./हेक्टर किंवा फ्ल्युक्लोरालीन 1.0 किग्रॅए. आय./ हेक्टर वापरावे आणि लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी हाताने तण काढून टाकल्या मुळे तणांवर नियंत्रण राहण्यास मदत होते.

 1. फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
  • खराब झालेली फळे गोळा करून नष्ट करणे आणि वाढलेले सुरवंट नष्ट करणे.
  • टोमॅटोच्या शेताच्या बांध्यावर झेंडू आणि एरंडासारखी सापळ्याची पिके लावणे.
  • आवश्यकते नुसार कोणत्याही किटकनाशकांची फवारणी: इमामेक्टिनबेन्झोएट एकराला 100 ग्रॅम किंवा क्लोरएंट्रिनीप्रोल एकरी 60 मिली किंवा फ्लुबेंडिमाईड एकराला 40 मिली किंवा थायोडीकार्ब एकरी 200 मिली किंवा स्पिनोसॅड एकराला 75 मिली फवारावे.
  • 2.0 मिली/ लिटरप्रमाणात अझाडिरिक्टिन 1.0% इसी किंवा 8 मिली/10 लिटर प्रमाणात इनडॉक्साकार्ब 14.5 % एससी किंवा 5ग्रॅ/ 10 लिटर प्रमाणात फ्लुबेडीएमाइड 20 डब्लूजी किंवा 7.5 मिली/ 10 लिटर प्रमाणात नोव्हल्युरॉन 10% इसी याची फवारणी केल्यामुळे सुध्दा फळे पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
 2. पांढरीमाशी नियंत्रण
  • पाने दुमडणारा रोग पडलेली रोपे उपटून टाका आणि नष्ट करा
  • किटकांना आकर्षित करण्यासाठी आणि मारण्यासाठी हेक्टरला 12 पिवळे चिकटसापळे लावा.
  • 40 किग्रॅ/ हेक्टर या प्रमाणात कार्बोफ्युरन 3% जी चा मातीत वापर किंवा डायमिथोएट 30% ईसी(1.0 मिली/लि) किंवा मालाथिऑन 50% ईसी (1.5 मिली/लि) किंवा ऑक्सीडेमेटॉन – मिथाईल 25% ईसी (1.0 मिली/लि.) किंवा थिआमिथॉक्झम 25% डब्ल्यूजी(4.0 मिली/10 लि.) किंवा ऍसिटामाश्रिड 100 ग्रॅम/लि ची फवारणी करावी.
 1. रोप कोलमडणे किंवा रोपमर
  • उंच गादीवाफे वापरावे
  • हलके पाणी द्यावे, परंतु चांगला निचरा होण्यासाठी वरचेवर सिंचन करावे.
  • कॉपरऑक्झीक्लोराईड 0.2% किंवा बोर्डेक्स मिश्रण 1% जमिनीमध्ये आळवणी करावे.
  • दमट पणाने फळ गळून पडण्यास प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोडर्माविरिडे(4 ग्रॅ/ किग्रॅबियाणे) किंवा थीराम (3ग्रॅ/ किग्रॅबियाणे) या बुरशीजन्य कल्चरने बियाणावर उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे.
  • ढगाळ हवामान असेल तेव्हा 0.2% मेटालाक्सीलची फवारणी करावी
 2. पाने दुमडण्याच्या रोगाचा बंदोबस्त
  • पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी हेक्टरला 12 पिवळे चिकटसापळे लावावे.
  • शेताच्या सभोवताली अडथळा निर्माण करणारी पिके-तृणधान्ये लावावी.
  • तणे काढून टाकवि तजाळीच्या किंवा हरीत गृहातील संरक्षित.
  • लावणी केल्यानंतर रोगवाहनावर नियंत्रण करण्यासाठी इमीडेक्लोप्रिड 0.05% किंवा डायमेथोट 0.05% दर 15, 25, 45 दिवसानंतर फवारा.

टोमॅटोची काढणी केल्यावर योग्य प्रतवारी केलीजाते आणि वाहतुकीदरम्यान काढणी नंतरचे नुकसान टाळण्यासाठी पन्हाळी पेट्या किंवा लाकडी टोपल्यांमध्ये पॅक करून वाहतूक केली जाते.

Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App