द्राक्षे शेती टिपा

भारतातील उप-उष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय आणि सौम्य उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशांमध्ये द्राक्षाचे पीक घेतले जाते. चांगला निचरा असलेल्या चिकणमातीपासून ते वाळू असलेल्या चिकणमातीपर्यंतच्या प्रकारची सेंद्रिय घटकयुक्त जमीन द्राक्षांसाठी उत्तम असते. चांगला निचरा नसलेली अल्कलीयुक्त जमीन टाळावी.

जमिनीची मशागत करून ३ मी रुंदीचा रस्ता सोडून १२० मी X १८० मी चे भूखंड वेगळे केले जातात. ७५ सेमी रूंद आणि ७५ सेमी खोल व ११५ मी लांबीचे चर खणले जातात. १५ दिवस ऊन मिळाल्यावर ४५ सेमी माती भरून ते बंद केले जातात.

जात आणि रोपण प्रणालीनुसार द्राक्षवेलांची/एकरची संख्या ठरते.

शीर्ष पध्दत – १३२० द्राक्षवेली/एकर; निफिन पध्दत – ४३५ द्राक्षवेली/एकर; लतामंडप पध्दत – २२४ द्राक्षवेली/एकर. जात आणि मातीची सुपिकता यानुसार सहसा अंतर बदलते. जास्त जोमदार जातींसाठी ६ मी x ३ मी किंवा ४ मी x ३ मी चे अंतर ठेवले जाते आणि कमी जोमदार जातींसाठी ३ मी x ३ मी किंवा ३ मी x २ मी चे अंतर ठेवले जाते.

द्राक्षवेलींचे वळण: भारतामध्ये अनेक वळण पध्दती प्रचलित आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय आहेत लतामंडप, टेलिफोन आणि सपाट छत चांदई पध्दत. वेलींची छाटणी ही द्राक्ष उत्पादकांद्वारे वापरली जाणारी एक महत्वाची आणि आवश्यक आंतरपीक पध्दत आहे.

जैविक खत वापरल्यामुळे द्राक्ष पिकाच्या पोषणासाठी महत्वाचे जैविक घटक मातीत टिकून राहण्यास मदत होते. द्राक्षाला भरपूर पोषण लागते आणि वनस्पतीच्या वाढीच्या आणि फळे येण्याच्या तसेच द्राक्षे विकसीत होण्याच्या स्थितीला योग्य खतांचा वापर करून पोषण केले जाते. बहुतांश द्राक्ष उत्पादकांनी ठिबक सिंचन वापरण्यास आणि फेर्टीगेशनवारे खत वापरास सुरुवात केली आहे.

नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मॅगनीझ, झिंक, तांबे आणि बोरॉन

अन्नद्रव्येमहाधन उत्पादन
नत्रमहाधन सल्फेट (अमोनियम सल्फेट), महाधन कॅल्शियम नायट्रेट
स्फुरदमहाधन सुपर
पालाशमहाधन पोटॅश, महाधन सल्फेट ऑफ पोटॅश, महाधन पोटॅशियम शोनाईट,
नत्र + पालाशमहाधन २४:२४:०, महाधन २०:२०:०:१३, महाधन १२:६१:०
नत्र + स्फुरदमहाधन १३:०:४५
नत्र + स्फुरद + पालाशमहाधन १२:३२:१६, महाधन १०:२६:२६, महाधन १६:१६:१६, महाधन १९:१९:१९, महाधन १३:४०:१३
कॅल्शिअममहाधन कॅल्शियम नायट्रेट (फिल्ड ग्रेड)
मॅग्नेशियम (मॅग्नेशियम)महाधन मॅग्नीशियम सल्फेट
गंधकमहाधन बेनसल्फ, महाधन झिंको बेनसल्फ, महासल्फ
कॅल्शियम + मॅग्नेशियम + गंधककॅल्शियम-मॅग्नेशियम-गंधक
लोहमहाधन फेरस सल्फेट (जमिनीतील वापरासाठी), महाधन एफई ईडीटीए (ठिबक वापरासाठी)
जस्त (झिंक)महाधन झिंक सल्फेट २१% आणि ३३% (जमिनीतील वापरासाठी), महाधन झिंक ईडीटीए (ठिबक वापरासाठी)
मँगेनीझमहाधन कॉम्बी
तांबे (कॉपर)महाधन कॉम्बी
बोरॉनमहाधन डीओटी आणि डीटीबी

द्राक्ष उत्पादकांना जमिनीमध्ये तसेच ठिबक प्रणालीद्वारे वापरता येतील अशी अनेक खते स्मार्टकेम देते. द्राक्ष उत्पादकांनी खालील वेळापत्रकाचे पालन करावे:

एप्रिल छाटणी:
जमिनीतून देण्यासाठी (एप्रिल महिन्यातील छाटणी ) तक्ता १:

 

 

द्राक्ष्यांसाठी शिफारस केलेले फर्टीगेशन शेड्यूल (एप्रिल छाटणी) – तक्ता २:

 

ऑक्टोबर छाटणी :
जमिनीतून देण्यासाठी (ऑक्टोबर छाटणी) – तक्ता ३:

 

द्राक्षासाठी शिफारस केलेले फर्टिगेशन शेड्यूल (ऑक्टोबर छाटणी) – तक्ता -४

पिकाला नियमीतपणे सिंचन देऊन मातीतील योग्य ओलावा टिकवून ठेवला जातो. ठिबक सिंचन प्रणालीद्वारे द्राक्ष लागवडीच्या पाण्याच्या गरजांची पूर्तता अधिक सक्षमपणे होते.

वेलींच्या ओळींमध्ये वाढलेले तण ट्रॅक्टरने खेचल्या जाणाऱ्या अवजारांनी काढली जातात. ओळींमध्ये वाढलेले तण हाताने खणून काढले जातात. कधीकधी उगवणी पश्चात तणनाशक जसे की ग्लायफोसेट हेक्टरी २.० किग्रॅ किंवा पॅराक्वॅट हेक्टरी ७.५ किग्रॅ या प्रमाणात तणांवर फवारली जातात. फवारणी करताना द्राक्षांच्या पर्णसंभारावर फवारा उडणार नाही याची काळजी घ्यावी.

 1. सूत्रकृमीचे नियंत्रण
  छाटणीपूर्वी प्रत्येक द्राक्षवेलीला एका आठवड्यात ६० ग्रॅ कार्बोफ्युरन ३ जी किंवा फॉरेट १०जी दाणे आणि त्यानंतर भरपूर सिंचन केल्यास सूत्रकृमींचे नियंत्रण करण्यास मदत होते. निदान १५ दिवस माती हलवू नये. त्यानंतर सामान्य खत दिले जाऊ शकते. प्रत्येक द्राक्षवेलाला २०० ग्रॅम निंबोळीची पेंड घातल्यानेही सूत्रकृमी नियंत्रित करण्यास मदत होते.
 2. पिठ्या ढेकूण व्यवस्थापन
  २ मिली कडुलिंबाच्या तेलामध्ये १ मिली डायक्लोरोवॉस मिसळून किंवा १ ग्रॅम ट्रिडेमॉर्फ फवारल्यामुळे पिठ्या ढेकणीचे नुकसान कमीत कमी राहण्यास मदत होते.
 1. भुरी रोग व्यवस्थापन
  ०.३% सल्फर किंवा २.५ – ४.० किग्रॅ/एकर सल्फरची भुकटी सकाळच्या वेळी फवारल्यामुळे रोग नियंत्रित करण्यास मदत होते.
 2. पानावरील ठिपके रोग नियंत्रण
  १ % बोड्रेक्स मिश्रण किंवा थिओ फॅनेट मेथील ४०० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड ४०० ग्रॅ/एकर किंवा हेक्साकोनाझोल २०० मिली/ एकर या प्रमाणात फवारणी करावी
 3. केवडा रोग व्यवस्थापन
  १ % बोड्रेक्स मिश्रण किंवा इतर कोणतेही कॉपर बुरशीनाशक ०.२५ % फवारावे

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सर्वोत्तम किंमत मिळावी यासाठी द्राक्षे योग्य स्थितीला काढली जातात आणि योग्यप्रकारे पॅक केली जातात.

Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App