सोयाबीन शेती टिपा

सोयाबीनची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते. सोयाबीनच्या जातींमध्ये दिवसांची लांबी हा प्रमुख घटक आहे कारण या कमी दिवसांच्या वनस्पती आहेत. सोयाबीनला चांगला निचरा असलेली सुपीक जमीन लागते जिचा सामू मात्रा ६.० – ७.५ असेल. मातीचा उत्तम प्रकार म्हणजे वालुकामय चिकणमाती जिच्यामध्ये सेंद्रिय घटक चांगले असतील. पाणी साठून राहणारी माती सोयाबीन लागवडीसाठी अनुरूप नाही.

Soybean requires a good seedbed with a reasonably fine texture and not too many clods. Land should be well levelled and free from crop stubble. One deep ploughing with mould board plough followed by harrowing twice or ploughing twice with a local plough are sufficient. There should be optimum moisture in the field at the time of sowing.

सोयाबीनसाठी वापरला जाणारा बियाणे दर हा राखल्या जाणाऱ्या अंतरानुसार सरासरी १६ किग्रॅ – २० किग्रॅ/एकर असतो. दोन रांगांतील अंतर: ४५ ते ६० सेमी रोपांतील अंतर: ४-५ सेमी.

सोयाबीनला चांगला गादीवाफा लागतो ज्याचा पोत बऱ्यापैकी चांगला असेल आणि त्यामध्ये खूप जास्त ढेकळे नसतील. जमीन योग्य सपाट केलेली आणि पेंढा नसलेली असावी. कुळवाच्या नांगराने एकदा खोल नांगरणी करून त्यानंतर स्थानिक नांगराने दोनदा कुळवणी किंवा दोनदा नांगरणी पुरेशी असते. पेरणीच्या वेळी मातीमध्ये चांगला ओलावा असावा.

सोयाबीन पिकाच्या पोषणाच्या गरजेनुसार, चांगले उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे सोयाबीन मिळावे यासाठी जमिनीतून आणि फवारणीतून वापरासाठी खालील खताच्या वेळापत्रकाची शिफारस केली आहे:

जमिनीमधून देण्याची खताची शिफारस

फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांची शिफारस

सोयाबीन खरीप हंगामामध्ये घेतले जाते आणि भरपूर पावसामुळे याला सिंचनाची गरज नसते. तथापि पिकाच्या फुले येण्याच्या आणि घाटे तयार होण्याच्या स्थितीत पाण्याची कमतरता टाळावी.

एकदल आणि द्विदल दोन्ही प्रकारच्या तणांचा सोयाबीन पिकामध्ये प्रादुर्भाव होतो. इचिनोक्लोआ एसपी हे सामान्यपणे उगवणारे तण आहे ज्याचे प्रभावीपणे नियंत्रण न केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते

 • पेरणीनंतर १५-२० दिवसांत इमीझातापीर १० एसएल १.० लि/हेक्टर किंवा १५-२० दिवसांत प्रोपाक्विझाफॉप १० ईसी ६२५ मिलि/हेक्टर या प्रमाणात तणनाशकाची फवारणी केल्यास इचिनोक्लोआ एसपीसह एकदल तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.
 • १५-२० दिवसांत एमईए २.० लि/हेक्टर या प्रमाणात (प्रोपाक्विझाफॉप + इमाझातापीर) यासारख्या मिश्र उत्पादनाचा वापर केल्यास एकदल आणि द्विदल दोन्ही तण नियंत्रित करता येतात.
 • सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरले जाणारे इतर तणनाशक म्हणजे १-३ दिवसांत १२.४ ग्रॅ/एकर या प्रमाणात डिक्लोसुलम ८४% डब्ल्यूडीजी, १५-२० दिवसांत १.०१ लि/हेक्टर या प्रमाणात (फोमासाफेन + क्विझालोफोप) ईसी, १५-२० दिवसांत ३७.५ ग्रॅ/हेक्टर या प्रमाणात क्लोरिमुरॉन एथील.

 1. शेंग अळीचे व्यवस्थापन
  • फेरोमोन सापळे लावा
  • एचए एनपीव्ही २५० एलई/हेक्टर, (किंवा)
  • क्विनालफॉस २५ ईसी १.५ लि/हेक्टर, (किंवा)
  • इंडोक्साकार्ब १४.५ एससी ५०० मिली/हेक्टर याप्रमाणात फवारणी करा.
 2. पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
  • फेरोमोन सापळे लावा.
  • शेताची बारकाईने तपासणी करा आणि रोपांचे अवशेष /कळप करून राहण्याच्या स्थितीतील सुरवंट असलेल्या वनस्पती काढून टाका.
  • पिकावर एनपीव्ही २५० एलई/हेक्टर याप्रमाणात फवारा किंवा
  • क्विनालफॉस २५ ईसी १.५ लि/हेक्टर किंवा इंडोक्साकार्ब १४.५ एससी ५०० मिली/हेक्टर किंवा स्पिनेटोराम ११.७ एससी ४५० मिली/हेक्टर याप्रमाणात फवारणी करावी.
 3. खोड माशीचे नियंत्रण
  • थायामेथोक्सॅम ३० एफएस १०ग्रॅ/किग्रॅ या प्रमाणात बियाणावर उपचार करा
 4. उंट अळीचे व्यवस्थापन
  • पोटॅशसह शिफारस केलेल्या खताच्या मात्रेचा वापर.
  • क्विनालफॉस २५ ईसी १.५ लि/हेक्टर किंवा क्लोरांट्रानिलिप्रोल २० एससी १०० मिली/हेक्टर किंवा इंडोक्साकार्ब १४.५ एससी ५०० मिली/हेक्टर किंवा आधी मिसळलेले कीटकनाशक बेटासायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिडची ३५० मिली/हेक्टर याप्रमाणात फवारणी करावी.
 5. पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन
  • थायामेथोक्सॅम ३० एफएस १०ग्रॅ/किग्रॅ या प्रमाणात सोयाबीनच्या बियाणांवर उपचार करावे;
  • पिवळे चिकट सापळे लावावे
  • वायएमव्हीचा प्रादुर्भाव झालेली सोयाबीनची रोपे काढून टाकावी.
  • पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करण्यासाठी आधी मिसळलेले कीटकनाशक बेटासायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिडची ३५० मिली/हेक्टर याप्रमाणात फवारणी करावी

तेवीस रोग ओळखले गेले आहेत आणि त्यांच्या आर्थिक महत्वानुसार मुख्य आणि किरकोळ म्हणून वर्गीकरण केले गेले. मिरोथिशिअम लीफ स्पॉट, ऑल्टरनेरिया लीफ स्पॉट, तांबेरा, बुड कुजव्या रोग, शेंग आणि खोड करपा, शेंग कुजव्या, बॅक्टेरीयल पिस्टल, पिवळा मोझॅक आणि नो पॅडिंग सिंड्रोम यांचे वर्गीकरण मुख्य रोगांमध्ये केले गेले.

सोयाबीनमधील रोग नियंत्रण

 • रोग अवरोधक ओळी/जाती लावणे
 • मका आणि ज्वारी व बाजरीची ४:२ गुणोत्तरात आंतरमाशगत
 • २ ग्रॅम कार्बोक्सन + थिरम किंवा थिरम आणि कार्बेन्डाझिमचे २:१ याप्रमाणात ३ग्रॅम/किग्रॅ बियाणे याप्रमाणात बियाणांवर उपचार करणे
 • जैवनियंत्रक घटकाने बियाणांवर उपचार उदा. ट्रायकोडर्मा व्हिरिड आणि स्यूडोमोनस फ्लोरेसेन्स
 • पानांवरील रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम किंवा थायोफीनेट मेथीलचा दोन फवारणीमध्ये वापरा आणि तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनामध्ये हेक्साकोनॅझोल, प्रोपिकोनाझल, ट्रायडीमेफोन किवा ऑक्सीकार्बॉक्सीन (०.१%) यांसारख्या बुरशीनाशकांची फवारणी करावी.

 • रोपं तयार झाल्यावर, पाने पिवळी पडून गळून पडतात आणि सोयाबीनच्या शेंगा चटकन वाळतात.
 • काढणीच्या वेळी, बियाणांतील आर्द्रता १५ टक्के किंवा कमी असावी.

Mahadhan SMARTEK