कांदा शेती टिपा

कांदा हे थंड हंगामातील पीक आहे. 13-240 से. दरम्यान तापमानात पिकाची चांगली वाढ होते. चांगला निचरा असलेली जमीन कांदा लागवडीसाठी उत्कृष्ठ मानली जाते. कांद्यासाठी सामू श्रेणी 5.8 – 6.5 अनुकूल असते. कांदे क्षारयुक्त जमिनीला खूपच संवेदनशील असतात आणि त्यामुळे क्षारयुक्त जमीन व सिंचनासाठी खारे पाणी टाळावे.

नांगरटीची चांगली खोली मिळवण्यासाठी जमिनीची 5-6 वेळा नांगरणी केली जाते आणि सरी व वरंब्या तयार केल्या जातात. कांदा लागवडीसाठीची जमीन चांगली भुसभुशीत आणि सुपीक असली पाहिजे.

1 एकर कांदा लागवडीसाठी 4 किग्रॅ बियाणे पेरलेला गादी वाफा पुरेसा असतो. 45-दिवसांची रोपे वरंब्यांच्या दोन्ही बाजूंना लावली जातात. रांगांतील अंतर 15 सेमी आणि रोपांतील अंतर 10 सेमी योग्य असते.

कांदा पिकासाठी 2-3 खुरपण्या पुरेशा असतात. 2 ते 3 सिंचनांनंतर, मातीचा भर देणे अतिशय उपयुक्त ठरते.

कांदा हे पोषक घटकांना चांगला प्रतिसाद देणारे पीक आहे. मातीची कमी सुपीकता व त्यामुळे होणाऱ्या अन्नद्रव्याची कमतरता यांचा विचार करता, कांद्याचे अधिक उत्पादन आणि उत्तम दर्जासाठी कांदा पिकासाठी अन्नद्रव्याचे व्यवस्थापन योग्यरित्या नियोजित करून प्रभावीपणे अंमलात आणल्यास कांदा फलोत्पादन चांगले होईल. जमीन व फवारणीद्वारे देण्याच्या खालील वेळापत्रकांची कांदा पिकाच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केली जाते.

जमिनीतून देण्यासाठी खताची शिफारस

फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खताची शिफारस

लागवडीनंतर आठवड्याच्या अंतराने सिंचन करावे. ठिबक सिंचन प्रणाली बसवण्याची शिफारस केली जाते.

डॅक्टीलोक्टेनियम ऍजीप्टियम, इल्युसाईन इंडिका, सीनोडोन डॅक्टीलोन, सायपेरस रोटंडस आणि पार्थेनियम हीस्टेरोफोरस यांसारख्या तणांचा कांदा पिकात प्रादुर्भाव होतो.

पेंडिमेथालिन 1.4 लि/एकर या प्रमाणात रोप लागवडीनंतर 1-3 दिवसांनी उगवणीपूर्व तणनाशक किंवा ऑक्सीफ्लुरोफेन 150-250 ग्रॅ/हेक्टर या प्रमाणात रोप लागवडीनंतर 15-20 दिवसांनी वापरावे 45 दिवसांनी एका हाताने तण काढणी केल्यामुळे कांद्यातील तणांचे व्यवस्थापन होण्यास मदत होते.

 1. फुलकिडे आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण
  फुलकिडे आणि पांढऱ्या माशीसाठी डायमेथोट 30 ईसी, 1 मिली/लिटर किंवा लिटरला 0.5मिली स्टिकर असलेले फिप्रोनिल 2 मिली/लि फवारणी करण्याची शिफारस केली जाते.
 2. कुरतडणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण
  क्लोरपायरीफॉस 2 मिली/लि या प्रमाणात जमीन भिजवून कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात.
 3. सूत्रकृमीचे नियंत्रण
  रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी हेक्टरला 1 किग्रॅ कार्बोफ्युरन 3 जी किंवा हेक्टरला 1 किग्रॅ फॉरेट 10 जी वापरल्याने सूत्रकृमी नियंत्रित केले जाऊ शकतात.
 1. पानांवरील ठिपक्यांचे व्यवस्थापन
  मॅन्कोझेब 2ग्रॅ/लिटर किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 2ग्रॅ/लिटरची फवारणी करून पानावरील ठिपक्यांचा रोग नियंत्रित करता येतो. 1 मिली टीपॉल 1 लिटर फवारणी द्रावणात मिसळावे.

काढणीपूर्वी एक आठवडा सिंचन थांबवले जाते. काढणीच्या वेळी कांदे तयार झालेले व कोरडे असावेत. 75 % पाने वाळल्यावर किंवा वरची गळून पडल्यावर काढणी केली जाते. काढणीची अचूक वेळ 50% पाने पडल्यावर असते. काढल्यानंतर, संग्रहण करण्यापूर्वी वरच्या भागासह कंद 10-15 दिवस सावलीत वाळवावे ज्यामुळे पिकातील उष्णता निघून जाते. नंतर योग्य प्रतवारी आणि वर्गवारी केली जाते.

Mahadhan SMARTEK