कापूस शेती टिपा

कापूस हे उष्ण हंगामातील पीक आहे. 850 – 1100 मिमी. पाऊस असलेल्या क्षेत्रांमध्ये याची वाढ चांगली होते. भारतात हे पीक बहुतेकदा कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. तथापि, सिंचनाची सुविधा आणि ठिबक प्रणालीमुळे शेतकऱ्यांना कापसाचे जास्त उत्पन्न मिळते.चांगला निचरा असलेली काळी माती कापसाच्या पिकासाठी उत्कृष्ठ असते.

एकदा नांगरणी करून व नंतर 2 किंवा 3 वेळा कुळवणी करून जमीन चांगली तयार केली जाते.

1 बी/पुंज अशा पेरणीची शिफारस केली जाते. जर  पेरणीनंतर 10-12 दिवसांमध्ये नाग्या भरून घ्याव्यात. शेतकऱ्यांनी घेतलेल्या संकर/जातीनुसार इष्टतम पीक मिळते.

शेतकऱ्यांनी त्यांच्या आवडीनुसार आणि सोईनुसार नियमीतपणे आंतरपिकाची कामे करावी असा सल्ला दिला जातो. आंतरपिकाची कामे केल्यामुळे मातीत हवा खेळती राहते आणि तणावर नियंत्रण राहण्यास मदत होते.

कापसाच्या पिकाला निदान 3 वर्षांतून एकदा एकरी4-6 टन या प्रमाणात शेणखत किंवा कॉम्पोस्ट खत घालावे. सिंचित कापसाच्या पिकाला कोरडवाहू कापसाच्या पिकापेक्षा जास्त पोषक घटक लागतात. ओलीतआणि कोरडवाहू दोन्ही स्थितींमध्ये विभाजनात नत्रयुक्त खत विभागून द्यावेत .

नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मॅगनीझ, झिंक, तांबे आणि बोरॉन

अन्नद्रव्येमहाधन खत
नत्रमहाधन24:24:0
स्फुरदमहाधन24:24:0
पालाशमहाधन पोटॅश
कॅल्शिअममहाधन कॅल्शियम नायट्रेट (फिल्ड ग्रेड)
मॅग्नेशियम (मॅग्नेशियम)महाधनमॅग्नीशियम सल्फेट
गंधकमहाधन बेनसल्फ
लोहमहाधनफेरस सल्फेट (जमिनीतील वापरासाठी)
महाधनफेरस ईडिटीए (ठिबक वापरासाठी)
झिंकमहाधन झिंक सल्फेट (जमिनीतील वापरासाठी)
महाधनझिंक ईडिटीए (ठिबक वापरासाठी)
मॅगेनीजमॅनगेनिज सल्फेट
तांबे (कॉपर)कॉपर सल्फेट
बोरॉनमहाधन बोरॉन (डिओटी) किवा डिटीबी

ठिबक सुविधा नसलेल्या कापसाच्या शेतकऱ्यांसाठी खत वापराची शिफारस (जमिनीतील वापरासाठी)

 

ठिबक सुविधा असलेल्या कापसाच्या शेतकऱ्यांसाठी फर्टिगेशनचे वेळापत्रक (तक्ता 2)

 

 

कापूस पिकाला फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खताचे वेळापत्रक

जरी कापसाचे पीक बहुतांश कोरडवाहू पीक म्हणून घेतले जात असले तरी, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत तिथे पिकाच्या कालावधीच्या विविध अवस्थांमध्ये नियमीत सिंचन द्यावे असा सल्ला दिला जातो. पीक तयार व्हायला लागले की शेतकऱ्यांनी सिंचन थांबवावे आणि पेरणीनंतर 150 किंवा 160 दिवसांनी सिंचन करू नये. साठलेल्या पाण्याला कापूस संवेदनशील आहे. त्यामुळे, पावसाळ्यात अतिरिक्त पाणी निचरा होईल याची काळजी घ्यावी.

गवत, मोठ्या पानांचे तण आणि नागरमोथा यांसह कापसाच्या पिकाला अनेक तणांचा संसर्ग होतो. हाताने तण काढून किंवा तणनाशक वापरून शेतकऱ्यांनी तणांचा बंदोबस्त करावा.

कापसाची पेरणी केल्यानंतर 3 दिवसांमध्ये, तण उगवण्यापूर्वी, खालीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाची शिफारस केली जाते:

 1. पेंडिमेथॅलिन 30% ईसी- 1000मिली/एकर;
 2. पेंडिमेथॅलिन 38.7% सीएस- 700मिली/एकर;

ग्लायफोसेट 36% एसएल (1 लि/एकरप्रमाणे) किंवा पायरिथिओबॅक सोडियम 10% ईसी (250मिली/एकरप्रमाणे) किंवा प्रोपाक्विझोफोप 10% ईसी (250मिली/एकरप्रमाणे) यांसारखे उगवणीपश्चात, बिन-निवडक कोणतेही तणनाशक पेरणीच्या स्थितीनंतर फक्त 60-70 दिवसांनंतरच आणि ते सुध्दा संरक्षण कवच किंवा एक हुड वापरूनच फवारावे म्हणजे मुख्य पिकांवर फवारले जाणार नाही.

बीटी कापूस आल्यापासून बॉलवर्म आणि इतर कुरतडणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तथापि, किटकांना अनुरूप स्थिती असताना किडीच्या प्रादुर्भावाच्या मोठ्या घटना कापसाच्या शेतांमध्ये आढळलेल्या आहेत: अमेरिकन बोलवर्म, फळे पोखरणारी आळी, ठिपक्यांचे बोलवर्म, गुलाबी बोलवर्म व तंबाखूजन्य सुरवंट बहुतांश वेळा कापूस पिकांमध्ये आढळतात.

पोखरणाऱ्या अळ्या, बोलवर्म आणि सुरवटांचा बंदोबस्त करण्यासाठीच्या पध्दती

 • हरभरा, उडीद, सोयाबीन, एरंड, ज्वारी इ. कमी प्राधान्य असलेली पिके कपाशीसह आंतरपीक म्हणून किंवा काठावरील पीक म्हणून घ्यावे.
 • पिकाचे उरलेले अवशेष काढून नष्ट करणे
 • न्युक्लीअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस (एनपीव्ही) चा वापर
 • क्विनाल्फॉस 25 ईसी, 20 मिली /10 लिटर पाण्यात किंवा कार्बारील 50 डब्ल्यूपी, 40 ग्रॅम/10 लिटर पाण्यात किंवा स्पिनोसॅड 45 /एससी, 0.01 % किंवा बीटा-सायफ्लुट्रिन 2.5 ईसी, 0.0025 % किंवा सायपरमेथ्रिन 10 ईसी, 7.5मिली/10लिटर पाण्यात किंवा सायपरमेथ्रिन 25 ईसी, 3.0 मिली/10 लिटर पाण्यात किंवा फेनवालेरेट 20 ईसी, 6 मिली/10 लिटर पाण्यात किंवा डिकामेथ्रिन 2.8 ईसी, 9मिली/10लिटर पाण्यात किंवा फ्लुवालिनेट 20 ईसी, 4.5 मिली / 10 लिटर पाण्यात, यांसारख्या किटकनाशकांची फवारणी करावी

कापसाच्या बहुतांश क्षेत्रांमध्ये रसशोषक किटकांचा प्रादुर्भाव हल्ली जास्त दिसत आहे. सामान्यपणे उद्भवणारे शोषक कीटक आहेत: तुडतुडे, मावा, पांढऱ्या माशा, फुलकिडे, कोळी आणि पिठ्या ढेकूण

रसशोषक  कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठीच्या उपाययोजना

 1. मावा, तुडतुडे आणि फुलकिडे
  मेथील डेमेटॉन 25 ईसी, 8 मिली /10 लिटर पाण्यात किंवा असेटामिप्रिड 20 एसपी, 100ग्रॅ/एकर किंवा स्पिनेटोराम 120 एससी – 180मिली/एकर किंवा असेफेट- 300ग्रॅ/एकर किंवा इमिडाक्लोप्रिड- 150मिली/एकर किंवा फिप्रोनिल 5% एससी- 250मिली/एकर याप्रमाणे फवारणी करावी
 2. पांढऱ्या माशीसाठी
  मेथील डेमेटॉन 25ईसी, 40 मिली /10 लिटर पाण्यात किंवा डिमेथोट 30 ईसी, 33 मिली/10लिटर पाण्यात किंवा ट्रिझोफॉस 25 ईसी, 10 मिली /10 लिटर पाण्यात किंवा फेन्पोपेथ्रिन 50 ईसी, 10मिली/10 लिटर पाण्यात किंवा असेटामिप्रिड, 100ग्रॅ/एकर किंवा डायथियुरॉन, 250ग्रॅ/एकर किंवा पायरिप्रोक्सिफेन, 400मिली/एकर याप्रमाणे फवारणी करावी
 1. मर रोग व्यवस्थापन
  • आम्लात बुडवलेल्या बियाणांवर कारबोक्सिन किंवा कारबेन्डाझिमने किलोला 4 ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी केल्यानंतर जुन-जुलैमध्ये रोपांचे जमिनीत राहिलेले संसर्ग झालेले अवशेष काढून जाळून टाका.
  • नत्रयुक्त आणि स्फुरद खतांच्या संतुलित मात्रेसह पोटॅशची वाढीव मात्रा वापरा.
  • हेक्टरला 100 टन या प्रमाणात शेतातील किंवा इतर सेंद्रिय खते वापरा.
  • 0.05 % बेनोमील किंवा 0.1 % कार्बेंडाझिमसह जागेवर ड्रेंचिंग करावे
 2. पानावरील ठिपके रोग नियंत्रण
  • संसर्ग झालेले रोपांचे अवशेष काढा व नष्ट करा.
  • रोगाची सूचना मिळताच हेक्टरला 2 किग्रॅ या प्रमाणात मॅनकोजेब किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईडची फवारणी करा.
  • 15 दिवसांच्या अंतराने दोन किंवा तीन फवारण्या केल्या जाऊ शकतात.
 3. जिवाणूजन्य ठिपके नियंत्रण
  • आम्लात बुडवलेल्या बियाणांवर कारबोक्सिन किंवा कारबेन्डाझिमने किलोला 4 ग्रॅम या प्रमाणात उपचार करावे किंवा बियाणे 1000 पीपीएम स्ट्रेप्टोमायसिन सल्फेटमध्ये रात्रभर भिजवून ठेवावे.
  • संसर्ग झालेले रोपांचे अवशेष काटून करावे .
 1. 7 दिवसांहून कमी मध्यांतरांनी वरचेवर काढणी करावी.
 2. पानांमध्ये ओलावा टिकून असताना सकाळी 10 ते 11 मध्येच केवळ काढणी करावी.
 3. फक्त चांगल्या फुटलेल्या बोंडांतीलच कापूस गोळा करावा.
 4. बोडांतून केवळ कापूस काढा आणि सहपत्रे झाडावर तशीच ठेवा.
 5. कापूस गोळा करून झाल्यावर, चांगला फुगीर कापूस निवडून वेगळा काढा.
 6. डाग पडलेला, रंग उडालेला आणि संसर्ग झालेला कापूस वेगळा ठेवा.

टिप: डाग पडलेला, रंग उडालेला आणि संसर्ग झालेला कापूस चांगल्या कापसामध्ये मिसळू नये, कारण त्यामुळे चांगला कापूसही खराब होतो आणि उत्पादनाचे बाजारमूल्य कमी होते.

Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App