खासगीपणा धोरण

स्मार्ट केम टेक्नॉलॉजिज प्रा. लि. (“महाधन”) यांच्याद्वारे महाधन आपल्या खासगीपणाचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहेत. हे खासगीपणा धोरण “धोरण”) फ्रेशडेस्कच्या मालकीच्या आणि त्यांच्याद्वारे संचालित वेबसाईट्स, तसेच आमच्या सेवा(वां)चे वापरकर्ते यांना लागू आहे. या खासगीपणा धोरणात आपण दिलेल्या वैयक्तिक माहितीचे संकलन, वापर, आदान-प्रदान आणि सुरक्षितता महाधनद्वारे कशी केली जाते याचे वर्णन केले आहे. तसेच यामध्ये आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर, प्राप्ती आणि दुरूस्तीच्या संदर्भात आपल्या पसंतींचे वर्णन देखील आहे. आमच्या सेवे(वां)द्वारे संकलित माहितीचा वापर ग्राहक महाधनसोबत ज्या सेवा पुरविण्याच्या उद्देशाने जोडलेला त्यांच्याशी मर्यादित राहील. या धोरणात कॅपिटल स्वरुपात वापरलेले परंतु इथे व्याख्या न दिलेल्या शब्दांचा अर्थ आमच्या सेवा अटींमध्ये (“अटी”) व्याख्या केल्याप्रमाणाचे राहील.

आमचे खासगीपणा धोरण किंवा प्रथांबाबत आपल्याला काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास, कृपया आमच्यासोबत या पत्त्यावर संपर्क साधा shantanu.savrikar@dfpcl.com.

1. वैयक्तिक माहितीची साठवण
एखादे खाते सक्रिय असेपर्यंत किंवा सेवा पुरविण्यासाठा आवश्यक असेपर्यंत आम्ही प्रक्रिया करत असलेली वैयक्तिक माहिती साठवून ठेवतो. आपले खाते समाप्त करण्याची आपली इच्छा असेल किंवा आपली माहिती आम्ही यापुढे वापरु नये अशी विनंती करायची असेल तर, कृपया आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधा shantanu.savrikar@dfpcl.com. आमच्या कायदेशीर उत्तरदायित्वांचे पालन करणे, अचूक वित्तीय आणि अन्य नोंदी राखणे, तंटे निवारण, आणि आमचे करार लागू करण्यासाठी आवश्यक असल्यानुसार आम्ही आपली माहिती साठवून ठेवू. आपले खाते समाप्त केल्यानंतर १४ दिवसांनंतर, लागू कायद्याने अन्यथा प्रतिबंधित केल्याखेरीज, आम्ही आपली सर्व माहिती काढून टाकू.

2. मोबाईल ऍप्लिकेशन्स
आपण आमची मोबाईल ऍप्लिकेशन्स डाऊनलोड, इन्स्टॉल करता आणि वापरता तेव्हा, आपण वापरता ते उपकरण, ऑपरेटिंग सिस्टीमची आवृत्ती, आणि उपकरण शोधक किंवा (किंवा “UDID”) यांच्याबद्दल माहिती आपोआप संकलित करतो.
आम्ही चालवत असलेले कोणतेही प्रसंग किंवा प्रचाराबात आपल्याला ताजी माहिती देण्यासाठी वेळोवेळी पुश नोटिफिकेशन्स आपल्याला पाठवतो. आपल्याला अशा प्रकारच्या सूचना यापुढे प्राप्त करण्याची इच्छा नसेल तर, तुम्ही उपकरण स्तरावर त्यांना बंद करु शकता. आपल्याला योग्य त्या सूचना खात्रीने मिळण्यासाठी, आपल्या उपकरणाबद्दल ठराविक माहिती संकलित करणे आम्हाला गरजेचे आहे जसे ऑपरेटिंग सिस्टीम आणि युजर ओळख माहिती.
आपला मोबाईल किंवा हँडहेल्ड उपकरणावर आमच्या मोबाईल ऍप्लिकेशनची कार्यक्षमता समजून घेणे आम्हाला शक्य होण्यासाठी आम्ही मोबाईल ऍनालिटीक्स सॉफ्टवेअर वापरतो. या मोबाईल ऍप्लिकेशनवर माहितीची नोंद केली जाऊ शकते जसे आपण हे मोबाईल ऍप्लिकेशन कितीवेळा वापरता, मोबाईल ऍप्लिकेशनच्या अंतर्गत उद्भवणारे प्रसंग, समन्वित वापर, परफॉर्मन्स डाटा, आणि हे मोबाईल ऍप्लिकेशन कोठून डाऊनलोड केले ती जागा. आपण मोबाईल ऍप्लिकेशनच्या अंतर्गत सादर केलेली कोणतीही वैयक्तिक ओळखयोग्य माहितीसोबत ऍनालिटीक्स सॉफ्टवेअरमध्ये साठवलेली माहिती आम्ही जोडत नाही.

3. वेबसाईट्सकडून पत्र व्यवहार
आमची बातमीपत्रे आणि/किंवा विपणनविषयक पत्रे पाठवण्यासाठी आम्ही आपल्या ईमेल पत्त्याचा वापर करु शकतो. आपल्याला अशी पत्रे प्राप्त करण्याची पुढे इच्छा नसेल तर, आपल्याला प्राप्त होणाऱ्या ईमेल्समध्ये समाविष्ट सूचनांचे पालन करुन किंवा आम्हाला shantanu.savrikar@dfpcl.com या पत्त्यावर संपर्क साधून आपण त्यातून बाहेर पडू शकता.
आम्ही आवश्यक असेल त्या प्रसंगी सेवा(वां)शी निगडीत उद्घोषणा आपल्याला पाठवू. उदाहरणार्थ, देखभालीसाठी आमच्या सेवा तात्पुरत्या स्थगित असतील तर, आम्ही आपल्याला एक ईमेल पाठवू. सामान्यतः, प्रचारात्मक स्वरुपाचे नसलेल्या पत्र व्यवहारांमधून आपण बाहेर पडण्याची गरज नाही. आपल्याला ती प्राप्त करण्याची इच्छा नसेल तर, आपण आपले खाते निष्क्रीय करु शकता.

4. जाहिरात
आमच्या वेबसाईट्सवर जाहिराती प्रदर्शित करणे किंवा अन्य वेबसाईट्वरील आमच्या जाहिरातींचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही तृतिय पक्षी जाहिरात नेटवर्क्ससोबत भागिदारी करतो. आमचे जाहिरात नेटवर्क भागीदार आमची वेबसाईट आणि अन्य वेबसाईट्सवरील आपल्या कार्यांबाबत माहिती संकलित करण्यासाठी कुकीज आणि वेब बिकन्सचा वापर आपल्या आवडीवर आधारित उद्दीष्टित जाहिराती आपल्याला पुरविण्यासाठी करु शकतात (ठराविक ठिकाणी आपली संमती आमच्याकडे असेल तरच असे करण्यात येईल).

5. माहितीचे संरक्षण
नियंत्रणाखालील माहिती गहाळ होणे, तिचा गैरवापर, आणि त्यात फेरबदल करण्याविरुद्ध संरक्षणासाठी वेबसाईट्स आणि सेवांकडे उद्योग प्रमाणित सुरक्षितता उपाय असतात. आपण आम्हाला संवेदनशील माहिती पुरवता तेव्हा (जसे क्रेडिट कार्डची माहिती किंवा लॉगइन तपशील), आम्ही ती माहिती सिक्युअर सॉकेट लेयर (SSL) द्वारे एनक्रिप्ट करतो.
इंटरनेटवर “परिपूर्ण सुरक्षितता” अशी कोणतीही गोष्ट नाही तरीही, आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व व्यवहार्य उपाय करतो. आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करु तरी देखील, आमच्या वेबसाईट्सकडे किंवा सेवा(वां)द्वारे संप्रेषित आपल्या माहितीच्या सुरक्षिततेची हमी आम्ही देऊ शकत नाही आणि कोणतेही संप्रेषण हे आपल्या स्वतःच्या जोखीमीवर राहील. आपली वैयक्तिक माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर, आम्ही अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी सक्त प्रक्रिया आणि सुरक्षेच्या वैशिष्ट्यांचा वापर करु.
याखेरीज, आम्ही संकलित करु त्या आपल्या वैयक्तिक माहितीच्या स्वामित्वाचे सर्व हक्क आपल्याकडेच राहतील. आपल्या वैयक्तिक माहितीच्या वापराबाबत वर सविस्तर दिलेली कलमे आणि खालील कायदेशीर प्रकटन यांच्यामध्ये नमूद केल्याखेरीज आम्ही आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही तृतिय पक्षांना विकणार किंवा देणार नाही किंवा आपल्यासोबत स्पर्धा करण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती वापरणार नाही. आपला खासगीपणा आणि आपल्या ग्राहकांचा खासगीपणा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आपल्या सुरक्षिततेबाबत आपल्याला काही प्रश्न असल्यास आपण आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधू शकता shantanu.savrikar@dfpcl.com.

6. दुरूस्ती आणि ताजी माहिती
विनंती केल्यावर महाधन आपली कोणतीही वैयक्तिक माहिती धारण करतात, किंवा तिसऱ्या पक्षाच्या वतीने तिच्यावर प्रक्रिया करतात का त्याबद्दलची माहिती आपल्याला देतील. अशा माहितीची विनंती करण्यासाठी कृपया आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधा shantanu.savrikar@dfpcl.com.
सेवे(वां)च्या किंवा वेबसाईटच्या युजर्सना आम्ही त्यांची माहिती महाधन नेविगेशन मेन्यूमधील माय अकाऊंट लिंकवर क्लिक करुन किंवा आमच्याकडे shantanu.savrikar@dfpcl.com या पत्त्यावर संपर्क साधून पाहू शकतात, अद्ययावत किंवा सुधारु शकण्याची मुभा देतो. माहिती पाहणे किंवा सुधारण्यासाठीच्या विनंतीवर आम्ही शक्य तितक्यालवकर आणि व्यवहार्य कालावधीच्या आत आम्ही प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो.

7. मुलांची वैयक्तिक माहिती
महाधन १३ वर्षे वयाखालील मुलांकडून कोणतीही वैयक्तिक माहिती जाणीवपूर्वक गोळा करीत नाही. आपले वय १३ वर्षांपेक्षा कमी असेल तर, आमच्या वेबसाईट्स किंवा सेवे(वां)द्वारे कोणतेही वैयक्तिक माहिती सादर करु नका. पालक आणि कायदेशीर रक्षकांनी आपल्या मुलांद्वारे होणारा इंटरनेटचा वापरावर लक्ष ठेवावे आणि त्यांच्या परवानगीविना आमच्या सेवा किंवा वेबसाईट्सद्वारे वैयक्तिक माहिती कधीही न पुरविण्याबाबत आपल्या मुलांना सूचना देऊन ही पॉलिसी लागू करण्यात मदत करावी. आपल्या १३ वर्षांखालील मुलाने आमच्या वेबसाईट्स किंवा सेवे(वां)द्वारे वैयक्तिक माहिती आम्हाला पुरविली आहे असे आपल्याला खात्रीलायक वाटत असेल तर कृपया आमच्याकडे संपर्क साधा आणि ती माहिती काढून टाकण्याचा आणि आपल्या मुलाचे खाते आमच्या डाटाबेसेसमधून समाप्त करण्याचा प्रयत्न आम्ही करु.

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK