नायट्रोजन आणि फॉस्फरस १:१ या प्रमाणात आहे आणि म्हणून १:१ प्रमाणात खताची शिफारस केलेल्या पिकांसाठी हे सुयोग्य खत आहे
यामध्ये २०% नायट्रोजन समाविष्ट आहे. यापैकी ९०% नायट्रोजन अमोनिकल स्वरुपात उपस्थित असतो आणि उर्वरित अमाईड स्वरुपात असतो. परंतु, संपूर्ण नायट्रोजन पिकांसाठी अमोनिकल स्वरुपात उपलब्ध असतो
यामध्ये २०% फॉस्फरस आहे यापैकी ८५ फॉस्फरस % हा पाण्यात विरघळणाऱ्या स्वरुपात उपस्थित आहे आणि हा फॉस्फरस पिकांसाठी प्रभावीपणे आणि सहजपणे उपलब्ध होतो.
यामध्ये १३% सल्फर आहे, जे एनपीके नंतर ४ थे मुख्य पोषक घटक आहे.
दाणेदार स्वरुपात आहे आणि विखरुन, जागेवर टाकून किंवा पेरणीच्या वेळी पाभरीने किंवा तिफणीने सहजपणे देता येते.
हायग्रोस्कोपिक स्वरुप बरेच कमी आहे आणि विविध प्रकारच्या जमिनीसाठी आणि पिकांसाठी सुयोग्य आहे.