जमिनीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मातीची तपासणी महत्वाची
मातीची तपासणी ही मातीचा प्रकार आणि उत्पादनक्षमता ओळखण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. मातीच्या प्रकारानुसार होणारे खतनियोजन खर्च कमी करते आणि उत्पादन वाढवते. प्रत्येक पिकाला आणि प्रत्येक प्रकारच्या मातीसाठी खतांचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. त्यायोगे, मातीच्या उपजत सुपिकतेचा फायदा घेता येतो. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात काही पोषक द्रव्ये दिली गेली तर मातीतील संतुलन बिघडते आणि त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होतो. समस्याग्रस्त क्षेत्रातील मातींचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परिक्षण करून त्यानुसार खतनियोजन केले तर अधिक लाभदायक ठरते.
शेतीविषयक सल्ला, मातीची तपासणी, पिकाचे संवर्धन, संरक्षण आणि बाजारपेठ इत्यादी सेवा पुरवून ‘महाधन’ हा ब्रँड शेतकऱ्यांचा एकमेव मदतनीस ठरण्याकडे वाटचाल करत आहे. याच वाटचालीचा भाग म्हणून कंपनीच्या क्रॉप न्युट्रिशन विभागाचे एक अतिशय प्रगत व अद्ययावत अशी ‘फार्म डायग्नोस्टिक सर्विसेस (अॅग्री लॅब)’ ही प्रयोगशाळा आपल्या सेवेमध्ये सादर केली आहे. या प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणांच्या आधारे व उच्चशिक्षित, कुशल व अनुभवी तंत्रज्ञांच्या मदतीने काम केले जाते.
स्मार्टकेमच्या या प्रयोगशाळेस नॅशनल अॅक्रिडायटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एन.ए.बी.एल.)- नवी दिल्ली या संस्थेने प्रतिष्ठेचे समजले जाणारे आय.एस.ओ/आय.ई.सी १७०२५-२००५ हे मानांकन दिले आहे. एन.ए.बी.एल. ही एक स्वायत्त संस्था असून ती क्रेंद्र शासनाच्या ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ विभागाशी संलग्न आहे. भारतामध्ये आय.एस.ओ./आय.ई.सी. १७०२५-२००५ हे मानांकन देणारी एन.ए.बी.एल. ही एकमेव शासनमान्य संस्था असून आय.एस.ओ./आय.ई.सी. १७०२५-२००५ मानांकनाच्या चौकटीमध्ये व एन.ए.बी.एल.ने ठरवलेल्या प्रमाणांनुसार कार्य करणाऱ्या प्रयोगशाळांनाच हे मानांकन दिले जाते.
एन.ए.बी.एल. संलग्नीकरण म्हणजे त्या प्रयोगशाळेच्या गुणवत्ता व तांत्रिक क्षमतेचे केलेले निष्पक्ष मुल्यमापन होय. हे संलग्नीकरण स्वत:ला प्रयोगशाळेच्या गुणवत्ता प्रणालीशी मर्यादित न ठेवता प्रयोगशाळेच्या तांत्रिक क्षमतेस औपचारिक मान्यता देत असल्याने ते आय.एस.ओ. -९००० पेक्षा अधिक वरच्या पातळीचे आहे. या प्रक्रियेमध्ये एन.ए.बी.एल.ने नेमलेल्या मुल्यमापन समितीमार्फत प्रयोगशाळेच्या स्कोपमध्ये उल्लेख केलेल्या विशिष्ट चाचण्या/तपासण्या करण्याच्या प्रयोगशाळेच्या क्षमतेचे व्यापक असे मुल्यमापन केले जाते. उदा.
1 | चाचणी पद्धतीचा संदर्भ व त्याची मान्यता |
2 | चाचणीसाठी वापरण्यात येणारी रसायने, काचपात्र, उपकरणे व इतर साधने यांची शुद्धता व अचुकता |
3 | प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांचे परिक्षणविषयक ज्ञान व कौशल्य |
4 | वरील सर्व गोष्टी किमान अर्हतेनुसार असण्यासाठी प्रयोगशाळेने अवलंबलेल्या विविध प्रक्रिया व त्याच्या नोंदी |
5 | चाचणी नमुना प्रयोगशाळेत आल्यापासून चाचणी अहवाल पाठविण्यापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांवरील नोंदी |
6 | चाचणीवर प्रभाव टाकणाऱ्या विविध घटकांची व्याप्ती व त्यामुळे पुन:चाचणीमध्ये दिसणाऱ्या अनिश्चिततेचं संख्याशास्त्राच्या आधारे मापन |
7 | एन.ए.बी.एल. संलग्नित वा इतर प्रतिष्ठित प्रयोगशाळांमार्फत चाचणी परिणामांचे पुष्टीकरण |
या मानांकनाचे ग्राहक शेतकऱ्यास खालीलप्रमाणे फायदे संभवतात
- विश्वसनीय व अचूक चाचणी
- प्रयोगशाळेच्या गुणवत्ता प्रणाली व तांत्रिक क्षमतेवर शिक्कामोर्तब
- चाचणी अहवाल व तंत्रज्ञांच्या क्षमतेची खात्री
- चाचणी अहवालाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृती
अतिशय मानाचे असे हे प्रयोगशाळा मानांकन मिळवणारी (स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज) ही देशातील पहिलीच खत कंपनी ठरली आहे.