आढावा

Manufacturers of Bulk and Speciality Fertilisers

स्पर्धात्मक अशा जागतिक कृषीक्षेत्रासाठी भारतीय शेतकत्यांचे सक्षमीकरण

१९९२ साली दीपक फर्टिलायझर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांनी आपला उद्योग विस्तारताना खतनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. आज स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड (एसटीएल) ही दीपक फर्टिलायझर्सच्या  संपूर्ण मालकीची उपकंपनी भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध खतनिर्मात्यांपैकी एक कंपनी ठरली आहे. ‘महाधन’ या ब्रँडखाली या कंपनीची उत्पादने बाजारात आलेली आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मिळावा आणि त्यांचे आयुष्य थोडे सोपे व्हावे हा या ब्रँडचा उद्देश आहे.

रसायनशास्त्राचा भक्कम पाया आणि त्यावर चढलेला तंत्रज्ञानाचा कळस याद्वारे महाधन हा ब्रँड स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा पायऱ्या झपाट्याने चढत गेला. ‘एक अतूट नाते’ या ब्रीदवाक्याला जगणाऱ्या ब्रँडने आपली मूल्ये आणि जमिनीशी असलेले नाते कायम राखले आहे. बाजारपेठेचा पक्का अंदाज आणि शेतकऱ्यांचा विश्वास हेच या प्रवासाचे फलित आहे.

अत्यंत एकसंध अशा खतांच्या बाजारपेठेत, ‘महाधन’ हा ब्रँड सातत्य, दर्जा आणि नाविन्यतेसाठी परवलीचा शब्द बनला आहे.

महाधनला मिळालेले काही मानाचे पुरस्कार :

  • अत्यंत मानाचा ईटी पुरस्कार – २०१७
  • कृषीक्षेत्रातल्या आदर्श कामगिरीसाठी – २०१६
  • भारताचा सर्वाधिक विश्वासार्ह ब्रांड – २०१५ आणि २०१६

तळोजा इथल्या प्रकल्पात कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इनक्रो (INCRO) तंत्रामध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे. तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशीलता या कंपनीच्या रक्तातच आहे. अत्यंत सुसज्ज अशी स्वतःची संशोधन आणि विकास प्रयोगशाळा असणारी ही कंपनी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी सदैव तयार असते.

यापुढील उद्दिष्ट म्हणजे १ कोटी भारतीय शेतकऱ्यांसाठी उत्पादकता वाढविणे

  • उत्पादनात वाढ – नवीन प्रकल्पामुळे कंपनीचे उत्पादन तिप्पट झाले आहे आणि यामुळे खतांचा अखंड पुरवठा शक्य आहे. (प्रतिवर्षी अतिरिक्त ८ लाख टनांची उत्पादन क्षमता, ज्यामध्ये जास्त कसदार आणि दर्जेदार श्रेणीच्या खतांचा समावेश असेल.)
  • भौगोलिक विस्तार आणि पुरवठयातील सातत्त्या – सतत वाढत असलेले विक्रेत्यांचे जाळे म्हणजेच जास्तीत जास्त ठिकाणांपर्यंत पुरवठा, ज्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध.
  • सर्वसमावेशक असे पिकपोषण उपाय – विशिष्ट पिके आणि या पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पिकनिहाय खत व पोषणाचे विविध पर्याय
  • तळागाळाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ – महाधन अॅपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी पिके आणि बाजारपेठेची माहिती आता २४ x ७ उपलब्ध.
Mahadhan SMARTEK