MAHADHAN Missed Call Dhamaka

अटी आणि नियम: “महाधन मिस्ड कॉल धमाका”

स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमीटेड, पुणे(कंपनी)यांच्याद्वारे चालवल्या जाणा-या महाधन मिस्ड कॉल धमाका(उपक्रम)मध्ये सामील होण्यापूर्वी या सर्व अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा.

या उपक्रमात सामील होण्याने तुमच्यावर या अटी आणि नियम बंधनकारक असतील हे तुम्ही मान्य करता आणि खाली दिलेल्या पात्रता आवश्यकता पूर्ण करता असे दाखवून देता.

उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रचाराचे सर्व साहित्य, जाहिराती इ. हा अटी आणि नियमांचा भाग आहेत. उपक्रमामध्ये सहभागी होणे मोफत, ऐच्छिक आणि पूर्णपणे ग्राहकाच्या निर्णयावर आधारित आहे आणि अनिवार्य नाही. या उपक्रमात सहभागी झालेल्या ग्राहकाला अटी आणि नियम तसेच कंपनीचा निर्णय पूर्णपणे आणि विनाशर्त मान्य करावा लागेल जो अंतिम असेल आणि उपक्रमाशी संबंधित सर्व बाबींमध्ये तो बंधनकारक असेल.

 1. पात्रता
  1. उपक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्राहकांसाठी/सहभागींसाठी खुला आहे.
  2. १८वर्षे वयावरील भारतीय नागरिकांसाठी उपक्रम खुला आहे.
  3. महाराष्ट्रभर महाधन खते खरेदी केल्यावर ग्राहक ८८८८६०६५०१वर मिस्ड कॉल देऊन उपक्रमात सहभागी होण्यास पात्र ठरतील.
  4. हा उपक्रम वरील राज्यात कार्यरत असलेल्या सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सच्या सर्व ग्राहकांसाठी खुला आहे(नेटवर्क उपलब्धतेच्या अधीन).
  5. ग्राहक या उपक्रमात वारंवार सहभागी होऊ शकत नाहीत.
  6. नोंदणी करताना जर ग्राहकांनी प्रीपेड/पोस्टपेड कनेक्शन/लॅंडलाईनचा क्रमांक दिला असेल तर हा उपक्रम लागू असेल.लॅंडलाईनचा क्रमांक दिला असेल तर मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे
  7. कंपनीचे संचालक, कर्मचारी आणि कंपनीचे जवळच्या कुटुंबातले सदस्य, सहयोगी कंपन्या,त्यांच्या जाहिरात आणि प्रचार कंपन्या, दलाल, व्यावसायिक सल्लागार आणि त्यांचे ऑडीटर्स यांना या उपक्रमात सहभागी होता येणार नाही.
 2. उपक्रम कालावधी

  २२ जून २०१८ ते ५ ऑगस्ट २०१८.
  या अटी आणि नियम केवळ उपक्रम कालावधीदरम्यान लागू असतील.

 3. उपक्रम कालावधी(वेळ)

  उपक्रम २२ जून २०१८ रोजी (००.०० तास) सुरु होईल आणि ५ ऑगस्ट २०१८ रोजी (२३.५९ तास) बंद होईल

 4. उपक्रम विवरण आणि सहभाग

  उपक्रमामधील सहभाग खालील टप्प्यांप्रमाणे असेल:

  1. केवळ उपक्रम कालावधीत दिवसभरात कधीही ८८८८६०६५०१वर मिस्ड कॉल द्या
  2. मिस्ड कॉल दिल्यावर ग्राहक सदर उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर करतो आणि उपक्रमाच्या अटी आणि नियम मान्य करतो.
  3. कंपनी किंवा कंपनीचे प्रतिनिधी ग्राहकाला फोन करतील आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक तपशील त्यांच्याकडून घेतील.
  4. ग्राहकाला उपक्रमाचे तपशील सोबत उपक्रमाच्या अटी आणि नियम असा एसएमएस येईल. ग्राहकाने पुढे जाण्यापूर्वी अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.
  5. हा एसएमएस उपक्रमामध्ये सहभागी झाल्याची पोच असा असेल.
  6. एसएमएसमध्ये महाधन मिस्ड कॉल धमाका असे लिहिलेले असेल, जर वापरकर्त्यांना मिस्ड कॉल दिल्यानंतर अनसबस्क्राईब करायचे असेल तर नंबर डि रजिस्टर करावा आणि मग पुढील कोणतीही माहिती पाठवली जाणार नाही.
  7. ज्या नंबरवरून मिस्ड कॉल दिला गेला असेल तो सहभागाचा नंबर/युनिक आयडेंटीफिकेशन नंबर असेल, जो पुढील संदर्भासाठी वापरला जाईल.
  8. उपक्रमाचा विजेता अनिश्चितरित्या/कॉंप्युटर व्यवस्थेद्वारे निवडला जाईल.
 5. विजेता निवड प्रक्रिया
  1. कंपनी/त्यांचेप्रतिनिधीयांनामिळालेल्यासर्ववैधआणियोग्यएंट्रीजलकीड्रॉसाठीपात्रअसतीलजोकॉंप्युटर व्यवस्था/सॉफ्टवेअरद्वारे कार्यान्वित केला जाईल.
  2. मोबाईल व्यवस्थेमधील अडचणी, सिस्टीम कार्यरत नसणे, डेटा बॅक अप, मोबाईल फोन सिस्टीम क्षमता आणि इतर तांत्रिक अड्थळ्यांसाठी कंपनीला जबाबदार धरता येणार नाही.
  3. जर ग्राहकाला कोणत्याही कारणामुळे उपक्रमामध्ये सहभागी होता आले नाही तर त्यासाठी कंपनीला कोणत्याही परिस्थितीमध्ये जबाबदार धरता येणार नाही.
  4. नोंदणी केल्याने ग्राहकाच्या उपक्रमामधील सहभागाची, निवडीची खात्री देता येत नाही.
  5. नोंदणीमुळे सदर उपक्रमामधील कोणतेही बक्षिस, भेट याची निश्चिती होत नाही.
  6. ग्राहक आणि इतर कुटुंब सदस्य यांना ग्राहकाची निवड प्रक्रिया, निवड न झाल्याची प्रक्रिया किंवा इतर ग्राहकाची निवड किंवा बक्षीसाबाबत कोणतेही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.
  7. ग्राहकाची ओळख तपासण्याचे अधिकार कंपनी राखून ठेवत आहे. याबाबतचे कोणतेही दावे/शंका विचारात घेतल्या जाणार नाहीत. जर याबाबत काही शंका असल्यास कंपनी कोणतीही सूचना आणि कारण न देता ग्राहकाला उपक्रमासाठी अपात्र ठरवू शकते.
  8. कोणतीही नोंदणी/एंट्री याचे हस्तांतरण करता येणार नाही.
  9. एखाद्या विशिष्ट मोबाईल क्रमांकावरून नोंदणी झालेल्या ग्राहकाची निश्चिती करता येत नाही असे झाल्यास त्या ग्राहकाची एंट्री अपात्र ठरवली जाईल.
  10. वास्तविक स्थिती, सहभागाचे प्रमाण, तांत्रिक मुद्दे, अपरिहार्य कारणे यामुळे कालावधीमध्ये बदल होऊ शकतात. जर काही कारणाने आऊट बाऊंड डायलर कॉल/एसएमएस यशस्वी झाला नाही तर कंपनी जबाबदार असणार नाही.
  11. कंपनी, तिचे सहयोगी आणि प्रतिनिधी निवडलेल्या ग्राहकाशी संपर्क साधण्याचे पूर्ण प्रयत्न करतील पण जर ग्राहकाशी संपर्क झाला नाही तर त्यासाठी ते कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत.
  12. जेव्हा ग्राहक मिस्ड कॉल देतो, तेव्हा जरी त्याची किंवा तिची राष्ट्रीय डू नॉट कॉल रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असेल तरी त्या व्यक्तीची कॉल/एसएमएसद्वारे संपर्क साधला जावा अशी इच्छा आहे असे गृहित धरले जाते.
  13. कंपनी आणि तिचे दलाल, सहयोगी आणि प्रतिनिधी निवडलेल्या ग्राहकाशी संपर्क साधण्याचा योग्य तो प्रयत्न करतील पण जर एसएमएसद्वारे किंवा कॉल ड्रॉप झाला किंवा संपर्क तुटला आणि तो होऊ शकला नाही यासाठी ते जबाबदार नसतील.
 6. सहभागाचे निकष
  1. सहभाग मोफत, पर्यायी आणि ऐच्छिक आहे. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
  2. कोणत्याही वेळी, एंट्रीजची तसेच ग्राहक/सहभागींची वैधता(सहभागीची ओळख, वय आणि राहण्याचे ठिकाण) तपासण्याचे तसेच कोणताही ग्राह्क/सहभागी ज्याने अटी आणि नियमांनुसार नसलेल्या एंट्री दाखल केलेल्या आहेत किंवा ज्याने प्रवेश प्रक्रियेला हानी पोचवली आहे अशा व्यक्तीस अपात्र ठरवण्याचे अधिकार कंपनी राखून ठेवत आहे.
  3. विजेत्याचा मृत्यू झाल्यास,बक्षीस देण्यासाठी विजेत्याच्या कायदेशीर वारसांचे दावे विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. सर्व विजेतेपदांची पूर्तताही कोणत्याही मर्यादेशिवाय पडताळणी, ओळख पुराव्यासह पात्रता पडताळणी आणि भारतीय निवास आणि अटी व नियमांशी पूर्ण सुसंगती यांवर अवलंबून आहे. पडताळणीसाठीची योग्य ओळख ठरवणे सर्वस्वी कंपनीच्या हातात आहे.
  5. विजेत्यांना बक्षिस घेताना पावतीवर, शपथपत्र, इंडेम्निटी, करार आणि/किंवा कंपनीला हवी असतील ती कागदपत्रे यावर सही करावी लागेल.
  6. विजेत्यांना हे मान्य करावे लागेल की सर्व बाबतीत आणि उपक्रमांबाबत उद्भवलेल्या वादांबाबतीत, निर्णयाबाबतीत कंपनीचा निर्णय अंतिम आणि ग्राहकांवर बंधनकारक असेल.
  7. बक्षीस विजेत्यांपर्यंत पोचवण्यात झालेल्या विलंबासाठी कंपनी जबाबदार असणार नाही.
  8. बक्षीसे ही विजेत्यांसाठी वैयक्तिक, अहस्तांतरणीय आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाहीत. बक्षीसांची अदलाबदली/रोख रकमेच्या बदल्यात जमा करता येणार नाहीत किंवा इतर कशाबरोबर जोडता येणार नाही.
  9. कंपनीने विनंती केल्यास विजेत्यांना, बक्षीस जिंकल्याबद्दल मोफत सर्व प्रचार उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागेल.(जसे प्रसिध्दी, फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी)आणि तसेच जर ते विजेते ठरले तर कंपनीला त्यांचे नाव, आवडीनिवडी, चित्र आणि/किंवा आवाज असतील तर प्रचार साहित्य किंवा कोणत्याही माध्यमामध्ये अमर्यादित काळासाठी मानधनाशिवाय या उपक्रमाच्या/कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी(फोटो, फिल्म आणि/किंवा त्याचे रेकॉर्डिंग) (कोणत्याही परिणामाशिवाय) सहभागी व्हावे लागेल आणि कंपनीद्वारे उत्पादित, वितरित, पुरवली जाणारी कोणतीही उत्पादने यांचा प्रचार करावा लागेल.
  10. उपक्रमामध्ये बदल, सुधारणा, विस्तार, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे याचे अधिकार कंपनी राखून ठेवत आहे.
  11. चुकीचा पत्ता किंवा ग्राहकाने दिलेली अपूर्ण माहिती यामुळे बक्षीस न पोहोचणे यासाठी कंपनी जबाबदार असणार नाही.
  12. देवाच्या अवकृपेमुळे, सरकारी कृतीमुळे, असे उपक्रम नियंत्रित करणारे कायदे, अपरिहार्य कारणे यामुळे होणारे नुकसान यासाठी कंपनी जबाबदार असणार नाही आणि अशा नुकसानासाठी कोणतीही नुकसानभरपाई देण्यास कंपनी बांधिल नाही.
  13. ग्राहक/विजेता कंपनीकडून मोबाईल आणि ईमेलवर जरी तो/ती ट्रायच्या नियमांप्रमाणे एनसीपीआर रजिस्टरमध्ये असले तरीही, कंपनीकडून सूचना मिळणे यास मान्यता देईल.
  14. उपक्रमाच्या कोणत्याही अटी आणि/किंवा नियमांमध्ये मध्ये बदल, सुधारणा, किंवा रद्द करणे याचे अधिकार कंपनी राखून ठेवत आहे.
  15. कंपनी कोणत्याही लागू होणा-या एनडीएनसी(नॅशनल डू नॉट कॉल) रजिस्ट्रीच्या नियमांसाठी जबाबदार असणार नाही. सर्व ग्राहक/सहभागी या अटी आणि नियमांप्रमाणे जरी ते एनडीएनसी, डीएनडी(डू नॉट डिस्टर्ब)अन्वये रजिस्टर्ड असतील तरी ग्राहकांनी स्वेच्छेने सदर उपक्रमात भाग घेतलेला आहे या न्यायानेकंपनीला एसएमएस पाठवणे आणि/किंवा निवडक ग्राहकांना/सहभागींना कॉल करणे याचे अधिकार असतील.
  16. ग्राहकाच्या झालेल्या खर्चासाठी कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
  17. कंपनी/विजेते याची पोचपावती देतील की, कंपनीकडे सध्याच्या आणि यानंतर विकसित केल्या जाणा-या सर्व साहित्याचा अनंतकाळासाठी जगभर वापर, त्यात बदल, पुनर्निर्मिती, प्रकाशन, सादरीकरण, फलक, वितरण, संबंधित साहित्य बनवणे आणि व्यावसायिक आणि विना व्यावसायिक कारणांसाठी करण्याचे सर्वाधिकार आहेत. कंपनी सर्व माहिती अस्सलतेसाठी तपासण्याचे किंवा अस्सल नसल्यास नाकारण्याचे सर्वाधिकार राखून ठेवत आहे.
  18. ग्राहकाची वैयक्तिक ओळख माहिती (सीपीआयआय) कंपनीकडून उपक्रम योग्य रित्या सुरू ठेवण्यासाठी आणि उपक्रमाची व विजेत्यांची प्रसिध्दी करण्यासाठी घेतली जाईल. जर ग्राहकाने आवश्यक असलेली सर्व माहिती जर सच्चेपणाने दिली नाही, तर कंपनी अशा ग्राहकाला अपात्र ठरवेल. कोणतीही अपूर्ण किंवा सर्वसमावेशक नसलेली एंट्री/एंट्रीज सर्वस्वी कंपनीच्या निर्णयानुसार उपक्रमामधून बाद ठरवल्या जाऊ शकतात.
 7. शेवट/स्थगिती

  हा उपक्रम कोणत्याही व्यक्तीस कोणतीही पूर्वसूचना न देता स्थगित करण्याचे, बदलण्याचे, पुढे ढकलण्याचे, थांबवण्याचे, बंद करण्याचे, रद्द करण्याचे सर्वाधिकार कंपनीकडे आहेत. उपक्रम असा मुदतपूर्व संपवणे, रद्द करणे, बंद करणे यासाठी कोणीही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी दावा करू शकत नाही.

 8. इतर
  1. ग्राहक या अटी आणि नियम तसेच कंपनीचे अंतिम आणि सर्व बाबतीत बंधनकारक असलेले निर्णय मान्य करतील. जे ग्राहक या अटी आणि नियम यांचे उल्लंघन करतील, उपक्रमाच्या कामकाजामध्ये लुडबूड करतील किंवा कंपनीशी विसंगत वा चुकीचे वर्तन करतील, अशा ग्राहकांना उपक्रमात अपात्र ठरवण्यात येईल. ज्यांची पात्रता शंकास्पद आहे किंवा ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे किंवा उपक्रमात सामील होण्यास अपात्र आहेत अशा व्यक्तींना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ब्लॉक करण्याचे अधिकार राखून ठेवत आहे.
  2. या अटी आणि नियम (आणि कोणताही वाद, विवाद, प्रक्रिया किंवा या अटी आणि नियमांसंदर्भात उद्भवणारे कोणतेही दावे)लागू असणारे कर कायदे आणि नियम, व भारतीय कायद्यानुसार बनवण्यात आलेले असून त्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी केली जाईल आणिकाही दावे, विवाद असल्यास, जरी इतर ठिकाणची न्यायालये/न्यायासने यांची समान न्यायकक्षा असली तरीहीपुणे येथील न्यायालय/न्यायासनाच्या संपूर्ण न्यायालयीन कक्षेत सोडवण्यात येतील.
मला सर्व नियम व् अटी मान्य आहेत
Mahadhan SMARTEK