
कसं मिळवाल डाळिंबाचं सर्वोत्तम पीक
नमस्कार! मी त्रिंबक तुळशीराम पाथ्रीकर. राहणार मु. लिंबेजळगाव, औरंगाबाद. माझ्या कुटुंबाची एकून ५५ एकर शेती आहे. डाळिंबासाठी आम्ही जेव्हा ग्लोबल सर्टीफिकेशन मिळवायचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मी महाधनचं बेनसल्फ आणि इतर खते वापरली. माझं डाळिंबाचं उत्पादन तर वाढलंच, शिवाय पिकाचा दर्जाही वाढला. माझ्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला फायदा व्हावा असं मला वाटतं. म्हणूनच मी डाळिंबाच्या पिकाची सर्व माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे.
वातावरण: डाळिंबाचं उत्तम पीक हवं असेल तर त्याला उपयुक्त असं वातावरणही पाहिजे. हे पीक २५-३०% तापमान असलेल्या आणि साधारण ५००-८०० मिलीमीटर पाउस असलेल्या प्रदेशात चांगलं येतं.
माती: सहसा हे पीक कुठल्याही मातीत येतं. पण फक्त माती जड नसावी आणि त्यात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मातीत ७.५ PH असणं गरजेचं आहे. पीक घ्यायच्या आधी मातीचं परीक्षण करून घेणं कधीही चांगलं. कारण डाळिंबाला नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर अश्या बऱ्याच पोषकतत्वांची गरज असते आणि ही पोषकतत्वं त्या मातीत असणं अत्यंत गरजेचं आहे.
कोणती खतं वापराल?: माती परीक्षण झाल्यावर तुमच्या मातीत कोणत्या पोषकतत्वांची कमी आहे याचा अभ्यास करून महाधनची खालील खतं वापरा –
पोषकतत्व | खताचं नाव |
---|---|
नायट्रोजन | महाधन सल्फेट |
फॉस्फरस | महाधन सुपर |
पोटॅशियम | महाधन पोटॅश |
नायट्रोजन + फॉस्फरस | महाधन २४:२४:०, महाधन २०:२०: ० – १३, महाधन १२:६१: ० |
नायट्रोजन + पोटॅशियम | महाधन १३:०: ४५ |
नायट्रोजन + फॉस्फरस + पोटॅशियम | महाधन १२:३२:१६, महाधन १०:२६:२६:, महाधन १६:१६:१६, महाधन १९:१९:१९, महाधन १३: ४०:१३ |
कॅल्शियम | महाधन कॅल्शियम नायट्रेट |
असंच विविध पोषकतत्वांसाठी कोणतं खत योग्य आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला महाधनच्या वेबसाईटवर मिळेल – http://www.mahadhan.co.in
खतांचं योग्य प्रमाण?: पिकाला योग्य प्रमाणात खत मिळायला पाहिजे तेव्हाच पीक चांगलं येतं. किती प्रमाण योग्य आहे हे कसं ठरवाल? सोप्पं झालंय भाऊ आता, महाधनमुळे. मी महाधनचं अॅप टाकलंय मोबाईलमध्ये. त्यात आहे डोस कॅल्क्युलेटर. यात पिकाचं नाव आणि आपली शेती किती आहे हे टाकलं की लगेच आपल्याला किती खत वापरलं पाहिजे.
तर बंधुंनो, सर्वोत्तम पीक हवं असेल तर मेहनत तर हवीच, पण आपण शक्य तितकी योग्य माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. मला जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची गरज पडली, तेव्हा मी महाधनच्या वेबसाईटकडे वळलो. योग्य माहिती आणि महाधन खतं यामुळेच मला यश मिळालं आहे असं मला मनापासून वाटतं. माझ्यासारखीच प्रत्येक शेतकऱ्याची प्रगती व्हावी!