Mahadhan - Sugarcane-Crop

ऊस पिकासाठी महाधन टोटल

ऊस पिकासाठी महाधन टोटल
August 1, 2017 Comments Off on ऊस पिकासाठी महाधन टोटल Blog,Blogs Marathi shetakaridhan
(दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच नैसर्गिक पीकवर्धक तत्त्वांनी युक्त से संपूर्ण पॅकेज)

ऊसाच्या दृष्टीने सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच दुय्यम अन्नद्रव्यांचे ऊस उत्पादन व साखर उताऱ्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांचे कार्य व्यवस्थित माहित नसल्याकारणाने ते ठराविक अन्नद्रव्यांचाच वापर करतात. रासायनिक खतांची वाढीव मात्रा पिकांना देऊन सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेत वाढ होत नाही. जमिनीचे आरोग्य व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन हा ऊसाच्या उत्पादनातील महत्त्वाचा भाग आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संतुलित वापरामुळे इतर अन्नद्रव्ययुक्त रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होतो. पिकांची उत्पादकता जवळजवळ १०-१५ टक्क्यांनी वाढण्यास मदत होऊन उत्पादनाची प्रत सुधारण्यास मदत होते. या दृष्टीने दीपक फर्टिलायझर्सने आवस्यक ती सर्व दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये ६० किलोच्या पॅकिंगमधून देण्याचा विचार केलेला असून ती खालील प्रमाणे आहे.

महाधन टोटल ६० किलो पॅकिंग मधील अन्नद्रव्यांचे प्रमाणे

अ. क्र अन्नद्रव्याचा प्रकार ६० किलो पॅकिंग मधील प्रमाण
(किलो)
१. महाधन बेनसल्फ (९०% दाणेदार गंधक) १५
२. महाधन मॅगसल्फ (मॅग्नेशियम सल्फेट २५
३. फेरस सल्फेट १०
४. महाधन नॅचरल जोश ०४
५. महाधन झिंकसल्फ (३३%) ०५
६. महाधन तेज डीटीबी (१५%) ०१
एकूण ६० किलो

महाधन टोटलची वैशिष्ट्ये

१. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा

२. यातील नैसर्गिक २५ अमिनो आम्ल, एन्झाईम्स व कर्बोदके इ. मुळे पिकाच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त

३. पिकाचा दर्जा सुधारतो. कांड्यांची संख्या वाढून ऊसाची जाडी व उंची वाढते.

४. उत्पादन वाढ होते.

उसासाठी एकरी मात्रा – एकरी ६० किलो प्रति एकर

पॅकिंग – ६० किलो

दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकांमधील महत्त्व

महाधन बेनसल्फ – हे दाणेदार ९०% गंधकयुक्त खत असून यामुळे ऊसाची वाढ चांगली होते. रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा वाढतो तसेच अल्कधर्मीय, चुनखडीयुक्त व चोपण जमीन सुधारते. जमिनीचा सामू सुधारल्याने स्फुरद, लोह, जस्त या अन्नद्रव्यांची पिकाला उपलब्धता होते. हे पेस्टाईल (दाणेदार) स्वरूपात असल्याने कुठल्याही खताबरोबर सहज मिसळून देता येते. गंधकामुळे नत्राची कार्यक्षमता वाढते.

मॅग्नेशियम सल्फेट – पिकामध्ये मॅग्नेशियम हा महत्त्वाचा घटक असल्याने पानांचा रंग गडद हिरवा होतो. तसेच प्रकाश संश्लेषणाच्या कार्यात अन्ननिर्मितीमध्ये मदत करते. कार्बोहायड्रेटस्, प्रथिने, मेद, विटॅमिन्सच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे कार्य मॅग्नेशियम बजावतो व एन्झाईम्सच्या रचनेमध्ये चालना देणाऱ्या क्रियेस त्याची मदत होते. मॅग्नेशियममुळे वनस्पतीमधील स्टार्चचे स्थलांतर होऊन इतर अन्नद्रव्यांच्या शोषणास सहाय्य होते.

फेरस सल्फेट (लोह) – लोह करमतरतेमुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. वनस्पतीमध्ये लोहाचे फार हळू वहन होत असल्याने या अन्नद्रव्यांची कमतरता पिकाच्या शेंड्याकडील भागात आढळून येते. लोह हा एन्झाईम्सच्या रचनेतील घटक असल्याने ऑक्सिडेशन – रिडक्षन क्रिया घडवून आणतो. प्रथिनांच्या निर्मितीकरिता लोह आवश्यक असून श्वसन तसेच प्रकाश संश्लेषण या क्रियांवरती तो नियंत्रण ठेवतो. पिकांची वाढ व उत्पत्तीमध्येया दोन्ही प्रक्रीया महत्त्वाच्या असतात.

झिंकसल्फेट (जस्त) – वनस्पतीमधील काही वाढ प्रेरकांच्या निर्मितीमध्ये जस्ताचा सहभाग असतो. वनस्पतीमधील पाण्याच्या शोषणासंबंधीशी जस्त जास्त निगडीत आहे. हा विविध एन्झाईम्सच्या संरचनेतील महत्त्वाचा घटक असल्याने वनस्पतीमधील विविध चयापचय क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविते.

महाधन तेज डीटीबी (बोरॉन) – बोरॉनचे प्राथमिक कार्य हे कॅल्शियम अन्नद्रव्यांचे मुळांद्वारे शोषण व त्याचा पिकाद्वारे वापर हा आहे. बोरॉन वनस्पतीमधील शर्करेच्या वहनास मदत करते तसेच क्षाराचे शोषण, संजीवकाचे चलनवलन व पाण्याची चयापचय क्रिया व पाणेयाचे संबंध इत्यादि कार्यात मदत करते. पिकांची अवर्षण सहन करण्याची क्षमता वाढविते.

About The Author
Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK