ऊस उत्पादन वाढीसाठी सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
ऊस पिकाच्या वाढीसाठी सतरा अन्नद्रव्यांची गरज असते . त्यांना आवश्यक अन्नद्रव्ये असे म्हणतात .
या अन्नद्रव्यांचे तीन प्रकार पडतात.
- मुख्य अन्नद्रव्ये :कर्ब, हायड्रोजन , प्राणवायु – हवा व पाणी द्वारे पिकांना मिळतात तर नत्र , स्फुरद, पालाश या अन्नद्रयांची पिकांना मोठ्या प्रमाणावर गरज लागते. ही पिकांना रासायनिक खतांद्वारे मिळतात.
- दुय्यम अन्नद्रव्ये :कॅलशियम , म्याग्नेशिअम व गंधक यांची पिकांना मुख्य अन्नद्रव्यांखालोखाल गरज लागते. ही सुध्दा पिकांना रासायनिक खतांद्वारे मिळतात.
- सुक्ष्म अन्नद्रव्ये :लोह , मंगल,जस्त , तांबे , बोरॉन , मॉलिब्डेनम , क्लोरीन व कोबाल्ट – ही पिकांना अल्प प्रमाणात लागतात परंतु आवश्यक असतात. – हि सुध्दा पिकांना रासायनिक खतांद्वारे मिळतात.
सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची कारणे :
- भर खतांचा वापर न करणे
- पिकांची फेरपालट न करणे
- द्विदल पिकांचे बेवड न घेणे
- संकरित वाणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे
- संयुक्त किंवा अती शुद्ध रासायनिक खतांचा वापर
१ टन ऊस निर्माण करण्याकरीता: १ ते १.५ किलो नत्र , ०.५ ते ०. ७५ किलो, ३ ते ४ किलो पालाश व ४० ते ६० ग्रॅम सुक्ष्मअन्नद्रव्ये लागतात |
ऊस पिकावर सुक्ष्म अन्नद्रव्यांमुळे होणारे चांगले परिणाम:
- पिकांच्या पानामध्ये हरितद्रव्ये तयार करण्यास मदत करतात त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते
- पिकांच्या वाढीसाठी लागणारे संयुजके तयार करण्यास मदत करतात
- नत्र आणि पिष्ठमय पदार्थांच्या चयापचयाच्या क्रियेत मदत करतात
- पिकांमध्ये जीवनसत्त्वे तयार करण्यास मदत करतात
- मुळांची वाढ होण्यास मदत करतात
- पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
- ऊसाच्या साखर उताऱ्यात वाढ होते
- ऊस उत्पादनात वाढ होते
ऊस पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर :ज्या जमिनीत लोह , जस्त , मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे, अशा जमिनीत प्रति हेक्टरी रासायनिक खतांव्यतिरिक्त –
- लोहासाठी – २५ किलो हिराकस ( फेरस सल्फेट )
- जस्तासाठी – २० किलो झिंक सल्फेट
- मंगलसाठी – १० किलो मँगेनीज सल्फेट
- बोरॉन साठी – ५ किलो बोरॅक्स वापरावे
ऊस पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना घायवयाची काळजी :
अ) सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना ते चांगल्या कुजलेल्या शेणखतात किंवा कंपोस्टखतात मिसळून त्यावर पाणी शिंपडावे व ५ ते ६ दिवसानी चांगले मुरल्यावर ते रासायनिक खतांच्या मात्रेसोबत जमिनीत चळी घेऊन द्यावे.
ब) ऊसाच्या उभ्या पिकामध्ये सूक्ष्मअन्नद्रव्येयुक्त खते फवारणीने देखील वापरता येतात
अ.नु | सूक्ष्मअन्नद्रव्ये व त्याची कार्य | सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरतेची लक्षणे | उपाययोजना |
---|---|---|---|
1 | लोह – पिकामध्ये हरितद्रवे निर्माण करणे, स्वसन क्रियेत मदत करणे |
|
|
2 | जस्त – अन्नपदार्थ निर्मितीमध्ये, प्रथिने निर्मितीमध्ये साखरेचे स्टार्च मध्ये रूपांतर करण्यासाठी |
|
|
3 | मंगल (मँगेनीज) – नत्र आणि असेंद्रिय आम्ले यांच्या चयापचयाच्या क्रियेत मदत , कर्ब ग्रहण क्रियेत मदत पिष्टमय पदार्थांचे रूपांतर कॅरोटीन व रिबोफ्लेवीन मध्ये करण्यास मदत करते |
|
|
4 | बोरॉन – पेशींचे आवरण तयार करण्यासाठी गरज, कारण बोरॉन हा पेशींचा घटक आहे, मुळांच्या वाढीसाठी प्रथिने तयार करणे, फलधारणा व गोडी निर्माण होण्यास मदत होते |
|
|
5 | मॉलिब्डेनम – पिकाच्या वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी ज्या क्रिया एन्झाईम करतात त्यात प्रामुख्याने भाग होतो, जीवाणूद्वारे हवेतील नत्र जमिनीत धरून ठेवण्यास मदत करतो आणि नत्र वायुचे रुपांतर अमोनियामध्ये करतो |
|
|
About The Author