गंधक वापरा व ऊसाची उत्पादकता हमखास वाढवा

गंधक वापरा व ऊसाची उत्पादकता हमखास वाढवा
March 8, 2019 Comments Off on गंधक वापरा व ऊसाची उत्पादकता हमखास वाढवा Blog,Blogs Marathi shetakaridhan

महाराष्ट्रात गेल्या साठ वर्षात साखर कारखानदारी बरोबर ऊसाचे क्षेत्र , साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येते . मात्र प्रति हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही .आजही राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ३५ टन एवढीच आहे. या परीस्थितीत ऊसाखालील क्षेत्र वाढविण्यापेक्षा ऊसाची प्रति हेक्टरी उत्पादकता व त्याचबरोबर साखरेचे उत्पादन वाढवणे हि आजची खरी गरज आहे.

ऊसाच्या शास्वत उत्पादनासाठी खत व्यवस्थापनला अनन्य साधारण महत्व आहे. कारण ऊस हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे त्याला अन्नद्रव्यांची गरज फार मोठी आहे.

ऊस पिकाला सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खत मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते. ऊस पिकासाठी लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत खतांची आवश्यकता असते. या रासायनिक खतानमधूनच नत्र , स्फुरद व पालाश या मुख्यअन्नद्रव्या बरोबरच दुय्यम ( CA, MG & S ) व सूक्ष्म अन्नद्रवे ( वेळेत पुरविली गेली पाहिजेत.

ऊसाची उत्तम उगवण आणि चांगल्या मुळ्या फुटण्यासाठी स्फुरद आणि पालाशची गरज असते. जोमदार फुटवे येण्यासाठी नत्राची गरज असते तर सल्फर मुळे क्लोरोफिल व प्रोटीनचे सिन्थेसिस होऊन प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगली होते व पानामध्ये अन्ननिर्मिती मोठ्या प्रमाणात होते . यामुळे रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा वाढतो .

पीक पोषण शास्रानुसार शेतीत “गंधक” हे चवथे महत्वाचे अन्नद्रव्य आहे . पिकाची गंधकाची गरज जवळजवळ स्फुरदाएवढी असून, पिकातील त्याचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते – जुळते आहे.

गंधकाची कमतरता दिसून येण्याची कारणे

 1. आधुनिक शेतीत पिकांकडून गंधकाचे भरपूर शोषण,
 2. गंधक-विरहीत खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर,
 3. गंधकाचे शोषण व पुरवठा यातील मोठी तफावत,
 4. सेंद्रिय खत वापराचा अभाव व काही प्रमाणात वापरलेल्या गंधकाचा पाण्याद्वारे होणारा निचरा.

 

अशा विविध कारणामुळे शेत जमिनीत गंधकाची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसू लागली आहे

ऊस पीक पोषणामधील गंधकाची महत्वाची भूमिका :

 1. नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या जोडीला केलेल्या गंधकाच्या वापरामुळे पिकाची उत्पादनक्षमता वाढते
 2. सुधारित खतांच्या वापराच्या परिणामकतेमुळे सुक्ष्म पोषणमुल्यांसह जमिनीतील सर्व उपलब्ध पोषणमुल्यांचे प्रमाण वाढते
 3. जमिनीच्या सामूची पातळी नियंत्रित करते, क्षारयुक्त जमिनीची गुणवत्ता वाढवते
 4. वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्यामध्ये विशेष सुधारणा होते . परिणामी प्रकाशसंश्लेनाची क्रिया अधिक प्रभावी होते . पिकांमधील स्टार्च, शर्करा, तेल, फॅट्स आणि जीवनसत्वे या सगळ्यात सुधारणा होते
 5. वनस्पतीमधील आवश्यक अमिनो आम्लाचा ९० टक्के भाग यामुळे बनतो . जसे की वनस्पतीमधील प्रथिनांची उभारणी करणारे सिस्टीन, सिस्टाईन आणि मिथिओनाईन.
 6.  

पिकांसाठी गंधकाचे स्रोत :

अ.नु. स्रोत गंधकाचे प्रमाण (टक्के)
बेनसल्फ ९०
अमोनियम सल्फेट २३
सिंगल सुपर फॉस्फेट ११
म्यॅगनेशियम सल्फेट ९.६
झिंक सल्फेट ( हेप्टाहाइड्रेट ) १०
झिंक सल्फेट ( मोनोहाइड्रेट ) १५
मँगनीज सल्फेट १७
फेरस सल्फेट १०. ५

 

पिके फक्त सल्फेट स्वरुपातील गंधकाचे शोषण करू शकतात. मुलभूत गंधक जर कठीण खड्यांच्या स्वरूपात असेल तर त्याचे सल्फेटमध्ये रूपांतर होण्यास बराच कालावधी लागतो त्यामुळे तो पिकास वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही.

वरील सर्व बाबींचा विचार करून स्मार्टकेम टेकनॉलॉजीजने ( महाधन ने )
– FAST तंत्रज्ञानाने निर्मित ९० टक्के दाणेदार (पेस्टाइल) “महाधन बेनसल्फ FAST ” बाजारात उपलब्ध केले आहे .

महाधन बेनसल्फ फास्ट कसे काम करते

 1. मातीत ओलाव्याशी संपर्क आल्यावर ह्या पेस्टाइलचे जलद विघटन होऊन मुलभूत गंधक पिकास त्वरित उपलब्ध होते.
 2. विघटन झालेल्या गंधकाचे ऑक्सिडेशन होऊन त्याचे सल्फेटमधे रूपांतर होते व ह्याच स्वरूपात ते पिकांना त्याच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत उपलब्ध होते.

 
ऊस पिकास गंधकाची गरज व वापरण्याची वेळ:

अ.नु. वापरण्याची वेळ मात्रा ( किलो / एकर)
बेसल डोसच्या वेळी (शेतजमिनीची मशागत करताना शेवटच्या कुळवणीबरोबर किंवा सऱ्या पडल्यानंतर सऱ्यातून देऊन मातीत मिसळावे) १०
मोठ्या बांधणीच्या वेळी २०

 
इतर गंधक स्रोतांच्या तुलनेत ऊस पिकात महाधन बेनसल्फ – FAST वापरल्याने होणारे फायदे

 1. ९० टक्के दाणेदार गंधक खत असल्याने पिकास समप्रमाणात जमिनीत पेरून देता येते
 2. यातील गंधक पिकांना जलद उपलब्ध होऊन ऊसाची चांगली व जोमदार वाढ होते
 3. नत्राची कार्यक्षमता वाढते
 4. जमिनीचा सामू सुधारल्याने स्फुरद, लोह व जस्त या अन्नद्रव्यांची उपलब्धता होते
 5. जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये महत्वाची भूमिका . त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो आणि खत वापर क्षमता ( Fertiliser USE Efficiency ) अधिक चांगली होते
 6. महत्वाच्या वाढीच्या टप्यात पिकांची अल्पकालीन व दीर्घकालीन गंधकाची गरज पुरवते
 7. पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते
 8. रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा 0.2 टक्कयांनी वाढतो परिणामी उसाची गुणवत्ता सुधारते व उत्पादनात 14 .27 टक्कयांनी लक्षणीय वाढ होते
 9. गाळपासाठीचे ऊस ७ % पर्यंत वाढतात
 10. ऊस शेतकरयांना प्रति एकर १६५०० रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न मिळते
 11. ऊस पिकात बेनसल्फच्या वापरामुळे १ रुपये अतिरिक्त खर्चावर १३.७५ रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळते
About The Author
Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK