खोडवा उसाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

खोडवा उसाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन
January 23, 2019 Comments Off on खोडवा उसाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन Blog,Blogs Marathi admin

खोडवा उसाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास, कमी खर्चात लागवडीच्या उसाएवढेच उत्पादन मिळते व फायदेशीर ठरते. पश्चिम महाराष्ट्रात असे काही यशस्वी शेतकरी आहेत कि ज्यांनी १० खोडवे घेऊन चांगले उत्पादन घेतले आहे. पूर्वहंगामी खोडवा उसाचे उत्पादन हे सुरु आणि आडसाली खोडवा उसापेक्षा जास्त व चांगले मिळते.

खोडवा ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी टिप्स

 1. प्रभावी खोडवा उसाच्या व्यवस्थापनसाठी- सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा . १५ फेब्रुवारी नंतर घेतलेल्या खोडवा ऊसावर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
 2. ऊस तोडणीच्या वेळी , पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे . शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढिग राहिल्यास तो पसरून दयावा . त्यानंतर ऊसाच्या बुडख्य्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे व वरून ऊसाचे बुडखे मोकळे करावेत जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब / फुटवे जोमदार येतील.
 3. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यांमुळे जमिनीखालील कोंब / डोळे फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते .
  जमिनीखालील येणारे कोंब / फुटवे जोमदार असतात. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील कांडीपासून डोळे फुटतात . असे येणारे फुटवे कमजोर असतात व क्वचितच त्यांचे उसात रूपांतर होते .
 4. बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच ०.१ % टक्के बाविस्टीन ( १ ग्रॅम बाविस्टीन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची) या बुरशीनाशकाची फवारणी करावी . त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो .
 5. शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया + १०० किलो दाणेदार सुपर + १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन शेंद्रीय खतामध्ये अथवा ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे . पाचट कुजण्यासाठी नत्र , स्फूरद व पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते.
 6. खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आलयावर रासयनिक खतांचा पहिला डोस दयावा. ही खते पहारीसारख्य्या औजाराच्या साहाय्याने जमिनीत वापसा असताना २ समान हप्त्यात विभागून दयावीत .
 7. पहिला खताचा डोस – १५ दिवसाच्या आतच पूर्ण करावा . यासाठी पहारीने किंवा कुदळीने बुडख्यापासून १५ ते २० सें .मी अंतरावर वरंब्याच्या बगलेत १५ ते २० सें .मी खोल चर घेऊन, दोन चारातील अंतर ३० सें .मी ठेवून सरीच्या एका बाजूला पहिला रासयनिक खतांचा डोस दयावा.
 8. दुसरा खताचा डोस – सरीच्या विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १२० दिवसांनी ( ४ महिन्यानी ) दयावा. ही खते दिल्यानंतर नेहमीप्रमाने पाणी द्यावे.
 9. सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता टाळण्यासाठी हेक्टरी २५ किलो FeSO4 , २० किलो ZnSO4 , १० किलो MnSO4 व ५ किलो Borax ही सूक्ष्मअन्नद्रव्ययुक्त खते १:१० या प्रमाणात शेंद्रीय खतात मिसळून दयावीत.
 10. खोडवा ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी ६० किलो सल्फर ( म्हणजेच एकरी २५ किलो सल्फर हे महाधन FRT बेंसल्फ या खतातून द्यावे )
 11. खोडवा ऊसाच्या अधिक व हमखास उत्पादनासाठी, खोडवा ऊसावर विद्राव्य खतांच्या २ फवारण्या खोडवा घेतल्यानंतर ३० व ४५ दिवसांनी घायव्यात .
 12. विद्राव्य खताच्या पहिल्या फवारणी साठी- Chelated Combi १ ग्रॅम + Calium Nitrate + ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे . यामुळे नवीन मुळे व जोमदार फुटवे येतात.
 13. विद्राव्य खताच्या दुसऱ्या फवारणी साठी – 24:24:00+13:00:45, 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे . यामुळे यामुळे शाखीय वाढीचा जोम वाढतो.
About The Author
Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App