रब्बी पिकांमधील गंधकाची भूमिका, एफआरटी बेनसल्फच्या माध्यमातून गंधकाची उपलब्धता पिकांच्या सकसतेत असलेले गंधक “एस” चे महत्व

रब्बी पिकांमधील गंधकाची भूमिका, एफआरटी बेनसल्फच्या माध्यमातून गंधकाची उपलब्धता पिकांच्या सकसतेत असलेले गंधक “एस” चे महत्व
October 1, 2018 No Comments Blog admin

Mahadhan

पीक पोषण शास्त्रात पहिले तीन महत्वाचे मुख्य/मोठे वनस्पती पोषक घटक आहेत:

१. नायट्रोजन, २. फॉस्फोरस, ३. पोटॅश

सुरुवातीला वनस्पतींना गरजेच्या असणाऱ्या पोषक घटकांमध्ये कॅल्शियम (४था क्रमांक) आणि मॅग्नेशियम (५ क्रमांक) यांच्यापाठोपाठ गंधक हे ६व्या क्रमांकावरील महत्वाचा पोषक घटक मानले जायचे. विविध जातीच्या नगदी पिकांचे वाढलेले उत्पादन, वाढते सखोल पीक नमुने, ओलिताखाली असलेल्या लागवड क्षेत्राचे वाढलेले प्रमाण, खतांच्या वापराची कमी होत असलेली परिणामकता, जमिनीचे कमी होत असलेले पोषणमूल्य, खतांचा असंतुलित वापर आणि पिकांना होणारा अनियंत्रित पाणीपुरवठा अशा विविध कारणांमुळे जमिनीतील गंधकाची पातळी झपाट्याने कमी होत आहे.

आपल्या देशात हरितक्रांती झाल्यानंतर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील जमिनीत गंधकाची कमतरता दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे पीक पोषण शास्त्रज्ञांना गंधकाच्या ६व्या महत्वपूर्ण स्थानाचा पुनर्विचार करणे भाग पडले. आणि आता गंधकाला “एन”, “पी” आणि “के”च्या पाठोपाठ ४थे महत्वाचे स्थान मिळाले आहे. परिणामी पीक पोषणाचे नवे समीकरण आता एन+पी+के+एस असे झाले आहे.

 
पीक पोषणामधील गंधकाची महत्वाची भूमिका:

 1. एन, पी आणि के यांच्या जोडीला केलेल्या गंधकाच्या वापरामुळे पिकांची उत्पादनक्षमता वाढते.
 2. सुधारित खतांच्या वापराच्या परिणामकतेमुळे सूक्ष्म पोषणमुल्यांसह जमिनीतील सर्व उपलब्ध पोषणमुल्यांचे प्रमाण वाढते.
 3. जमिनीची पीएच पातळी नियंत्रित करते, क्षारयुक्त जमिनीची गुणवत्ता वाढते.
 4. वनस्पतींच्या पानांमधील हरितद्रव्यामध्ये विशेष सुधारणा होते. परिणामी प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया अधिक प्रभावी होते. पिकांमधील स्टार्च, शर्करा, तेल, फॅट्स आणि जीवनसत्व या सगळ्यांत सुधारणा होते.
 5. वनस्पतींमधील आवश्यक अॅमिनो अॅसिड्सचा ९०% भाग यामुळे बनतो जसे की वनस्पतींमधील प्रथिनांची उभारणी करणारे सिस्टेन, सिस्टीन आणि मीथीओनीन.

 
 
प्रथिने आणि तेलबिया पीक:

अ. डाळी ब. शेंगदाणे क. शेंगा ड. सूर्यफूल इ. हळद फ. तीळ ग. एरंडेल ह. सोयाबीन

उत्पादनात २०-२५% सुधारणा, शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या पिकांमधील तेलाच्या प्रमाणात १०-१५% वाढ

 
गंधकाच्या वापराला आणि पीक उत्पादन तसेच गुणात्मक उत्पादनामध्ये त्यामुळे मिळणारे फायदे यांना पिकांचा चांगला प्रतिसादफळ पीके:

अ. केळी ब. डाळींब क. नारळ ड. द्राक्षे

उत्पादनात २०-२५% सुधारणा, सुधारित उत्पन्न, फळांची गुणवत्ता आणि दीर्घकाळ फळे टिकून राहण्याची क्षमता यांच्यासह पिकांच्या बाजारपेठेतील स्थानामध्ये सुधारणा. फळ पिकांवर परिणाम करणाऱ्या बुरशी रोगांना विरोध

 
भाजीपाला पिके:

अ. बटाटा ब. मटार क. टोमॅटो ड. मिरची इ. कोबी फ. लसूण ग. कांदा

उत्पादनात ३०-३५% सुधारणा, बटाट्यामधील स्टार्चमध्ये लक्षणीय सुधारणा, कांदा आणि लसूण यांच्यामधील तिखटपणा वाढतो. सुधारित उत्पन्न, भाज्यांची गुणवत्ता आणि दीर्घकाळ भाज्या टिकून राहण्याची क्षमता याच्यासह पिकांच्या बाजारपेठेतील स्थानामध्ये सुधारणा. भाजीपाला पिकांवर परिणाम करणाऱ्या बुरशी रोगांना विरोध

 
अन्नधान्य पिके:

अ. गहू ब. तांदूळ क. मका

उत्पादनात २०-२५% सुधारणा, अन्नधान्यांमधील बेकिंग गुणवत्तेत ठळक सुधारणा

 
तृणधान्य पिके:

अ. ऊस ब. गुरांसाठी चारा, वैरण

ऊस गाळापासून १०-१५% साखर वाढ, चाऱ्याची गुणवत्ता वाढते परिणामी गाय, म्हशींपासून मिळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पोषणमूल्यात वाढ

खालील यादीत दिलेली काही खते आणि सूक्ष्मपोषक घटकांमधील क्षार यातून पिकांना गंधक पोषक घटक म्हणून मिळतो पण या खतांमधून मिळणाऱ्या गंधकाच्या प्रमाणाला स्वतःच्याच काही मर्यादा आहेत.

 
पिकांना पोषक म्हणून गंधक पुरविणारी खते:

 1. सिंगल सुपर फॉस्फेट                 ११% गंधक
 2. अमोनियम फॉस्फेट सल्फेट        १३%गंधक
 3. अमोनियम सल्फेट                    २०.५ %गंधक
 4. पोटॅशियम सल्फेट                     १७.५%गंधक
 5. मॅग्नेशियम सल्फेट                      ९.६ %गंधक
 6. झिंक सल्फेट                           १०-१५ %गंधक
 7. फेरस सल्फेट                           १०.५ %गंधक
 8. मँगेनिज सल्फेट                        १७ %गंधक
 9. कॉपर सल्फेट                           १२ %गंधक

पीक पोषणामधील गंधकाची वाढती गरज भागविण्यासाठी महाधन ब्रँडतर्फे २५ वर्षांपूर्वीच आपल्या ”भारत” देशातील प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी बेनसल्फ नावाचे ९०% दाणेदार गंधक खत सादर करण्यात आले.

मुंबईजवळील तलोजा आणि दिल्लीजवळील पानिपत येथील उत्पादन कारखान्यात बेनसल्फच्या उत्पादनातील तंत्रज्ञानात स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेडने सुधारणा करून “एफआरटी बेनसल्फ” ही बेनसल्फची नवीन आवृत्ती २१ ऑगस्ट २०१८ रोजी सादर केली.

 
एफआरटी बेनसल्फ काय आहे?

एफआरटी म्हणजे फास्ट रिलीज टेक्नोलॉजीचे बेनसल्फ. यामध्ये ९०% मुलभूत गंधक आणि त्यास धारण करणारी १०% बोन्टोनाईट मृदा यांचा समावेश आहे.

 
हे काम कसे करते?

सल्फेट SO4च्या रुपात पिकांकडून गंधक शोषून घेतले जाते. त्यामुळे ९०% गंधक असलेल्या मुलभूत गंधकाला जमिनीत पिकांच्या मुळाशी सल्फेटच्या रुपात बदलून घ्यावे लागते. जेव्हा जमिनीतील ओलसरपणाशी एफआरटी बेनसल्फचा संपर्क येतो, तेव्हा बेन्टोनाईट क्ले त्याच्या घनफळाच्या २० पट ओलसरपणा शोषून घेतो आणि अशाप्रकारे बेनसल्फ पेस्टाईल नावाच्या दाणेदार खताला विलग करण्यात मदत करतो. ५० मायक्रोन पेक्षा छोट्या आकारातील कणांमध्ये तुकडे झाल्यावर जमिनीत उपलब्ध ऑक्सिजनच्या आधारे ऑक्सिडेशन तंत्रज्ञानाच्या साथीने थिओबॅसिलस आणि अॅसिडो बॅसिलस यांच्यासारख्या जीवाणूंच्या मदतीने पिकांसाठी सल्फेट रुपात गंधक सोडतो.

 
पिकांच्या पोषणासाठी एफआरटी बेनसल्फचा वापर का करावा?

 1. शास्त्रज्ञ आणि प्रगतीशील शेतकऱ्यांमध्ये पीक उत्पादनातील “एस”चे महत्व वाढविण्याविषयी जनजागृती आणि संपूर्ण भारतात पिकांच्या पोषणासाठी बेनसल्फचा उपयोग वाढविण्याचा प्रवाह सुरु करण्यासाठी.
 2. छोट्या कालावधीतील पिकांसाठी फायदेशीर- जसे की कांदा, लसूण, मिरची, आलं, सोयाबीन, शेंगदाणे, बटाटा, टोमॅटो, तेलबियांची पिके, कापूस, अन्नधान्य पिके. या पिकांमध्ये जमिनीत एफआरटी बेनसल्फचा चांगला परिणाम दिसून येण्यासाठी प्रत्येक एकरमध्ये १०-१५ किलो खताचा वापर सुचविण्यात आला आहे.
 3. मोठ्या कालावधीच्या पिकांसाठी जसे की; ऊस, केळी, लिंबू, डाळींब, द्राक्षे, नारळ, चहा/कॉफी, आंबा, विविध फळे, भाजीपाल वर्गीय पिके, मसाले आणि फोरेज पिकांचे चांगले उत्पादन मिळावे आणि पिकांची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी वाढीच्या टप्प्यात व फळ धरायच्या आधी अशा किमान दोन वेळा एकरी २५-४० किलो खत घालावे असे सुचविण्यात आले आहे.

 
 
यादीत वर दिलेल्या खतांच्या इतर स्त्रोतांच्या तुलनेत एफआरटी बेनसल्फच्या वापराचे मिळणारे फायदे

 1. उच्च विश्लेषणात्मक खत म्हणजेच सर्वाधिक ९०% गंधक समाविष्ट
 2. महत्वाच्या वाढीच्या टप्प्यात पिकांची अल्पकालीन आणि दीर्घकालीन गंधकाची गरज पुरविते. एफआरटी तंत्रज्ञानाने ही गोष्ट साध्य होते.
 3. बारीक दाणेदार वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे निचऱ्याद्वारे हानी जवळपास नाही.
 4. शेतकऱ्यांसाठी वाजवी किंमतीत चांगला परतावा देणारे उत्पादन. वापरायला सुलभ, कमी पाण्याच्या प्रदेशातही प्रभावी, पिकाच्या संपूर्ण जीवनचक्रात १००% “एस” पोषक घटक एकरूप
 5. जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये महत्वाची भूमिका. क्षारयुक्तपासून आम्लीयपर्यंत जमिनीचे पीएच नियंत्रण. त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो आणि खत वापर परिणामकता (फर्टिलायझर युज एफिशियन्सी- FUE)अधिक चांगली होते.

Mahadhan

About The Author
Translate »
Mahadhan SMARTEK