मातीचे गुणधर्म आणि त्यांचे महत्त्व

मातीचे गुणधर्म आणि त्यांचे महत्त्व
December 3, 2018 No Comments Blog admin

Mahadhan

मातीचे गुणधर्म आणि त्यांचे महत्त्व

भौतिक गुणधर्म:

मातीचा पोत: जलधारणा, अन्नद्रव्य धारण क्षमता, निचरा व सच्छिद्रता यावर परिणाम करतो.
अपेक्षित पोत: वाळूयुक्त पोयटा

मातीची जडणघडण: जडणघडणीचा प्रभाव जमिनीच्या मशागतीतील सुलभता, पाण्याची झिरपकता व निचरा, मातीची सच्छिद्रता यासर्वांवर होतो.
अपेक्षित जडणघडण: रवाळ

रासायनिक गुणधर्मः

मातीचा सामू: अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर सर्वात जास्त प्रभाव असणारा हा गुणधर्म असल्याने अतिशय महत्त्वाचा आहे.
अपेक्षित सामू: ६.५ – ७.५

मातीची विद्युतवाहकता: याचा प्रभाव वनस्पतींना होणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेवर होतो.
अपेक्षित विद्युतवाहकता: ०.०८ डीएस / मीटर पेक्षा कमी

सेंद्रीय कर्ब: हा गुणधर्म जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता दर्शवतो, याचा अनुकूल परिणाम मातीच्या सर्व गुणधर्मांवरती होत असतो.
अपेक्षित प्रमाण: ०.४१% पेक्षा जास्त.

कॅल्शियम कार्बोनेट (मुक्त चुना): मुक्त चुना जास्त असल्यास याचा प्रतिकूल परिणाम मातीच्या सामुवर तसेच स्फुरद, लोह, मंगल, जस्त, तांबे व बोरॉनच्या उपलब्धतेवर होतो.
अपेक्षित मुक्त चुना: ५% पेक्षा कमी

मातीची सुपीकता: पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची क्षमता. (सिक्स-टायर पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचे प्रमाण मध्यम वा त्यापेक्षा जास्त असावे)

पिकास आवश्यक १६ अन्नद्रव्य व त्यांचे संक्षिप्त जैव-रासायनिक कार्य:

आवश्यक अन्नद्रव्यवनस्पतीं वापरत असलेले स्वरूपजैव-रासायनिक कार्य
कार्मि, हा्ड्रोजि, ऑल्ससजिCO2, H2Oजैवरासायनिक प्रक्रियेमध्ये हे एकत्र येऊन कर्बोदके बनतात, कर्बोदकांपासून वनस्पतींचा सांगाडा बनतो.
नत्र, गंधकNO3, NH4+, SO42-कर्बोदकांबरोबर एकत्र येऊन अमिनो आम्ल व प्रथिनांची निर्मिती करतात. एंझायमॅटिक प्रक्रियेमध्ये महत्वाचे कार्य बजावतात.
स्फुरदPO33-, H2PO4, HPO42-ATP च्या माध्यमातून ऊर्जेच्या वहनामध्ये यांचे महत्वाचे कार्य आहे.
पालाश, मॅग्नेशियम, कॅल्शियम, क्लोरीनK+, Ca2+, Mg2+, Clवनस्पतींच्या अंतरंगामध्ये पाण्याचा दाब नियंत्रित करतात, भितिकांची सच्छिद्रता व विदुयत भराचे नियंत्रण, ऋण भारीत कणांचा समतोल.
लोह, मॅंगनीज, जिंक, कॉपर, मोलिब्डेनमFe2+/Fe3+, Mn2+, Zn2+, MoO42-ऋण भारीत कणांच्या वहनामध्ये महत्वाचे कार्य
बोरॉनH3BO3, BO33-कर्बोदकांच्या जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये महत्वाचे कार्य.

वरील दिलेल्या इष्ट वा अपेक्षित गुणधर्मांमध्ये प्रतिकूल बदल झाल्यास मातीमध्ये असंतुलन दिसून येते.

असंतुलनाचे प्रमाण ओळखण्यासाठी माती परीक्षण करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

माती परीक्षण काय आहे:

माती परीक्षण हि एक शास्त्रीय प्रक्रिया असून प्रयोगशाळेमध्ये मातीचे भौतिक व रासायनिक परीक्षणावर आधारित तिची उत्पादन क्षमता व पिके घेण्याची योग्यता तपासली जाते.

माती परीक्षण अहवाल हे पिक व जमीन व्यवस्थापनामधील एक प्रभावी अस्त्र असून, यामुळे शेतीमधील जोखीम कमी करण्यास मदत होते. मातीमध्ये झालेल्या प्रतिकूल बदलांवर उपाययोजना करून पिक वाढ व योग्य उत्पादन मिळण्यासाठी याचा उपयोग होतो.

About The Author
Translate »
Mahadhan SMARTEK