‘फोलिअर फीडिंग’चे महत्व

‘फोलिअर फीडिंग’चे महत्व
August 9, 2018 No Comments Blog admin

Mahadhan

‘फोलिअर फीडिंग’ हे रोपांना पोषण पुरविण्याचे एक असे तंत्र आहे, ज्यामध्ये थेट रोपांच्या पानांवर द्रवरूप खतांचा फवारा केला जातो.
 
पोषणद्रव्ये, पोषक घटक कसे शोषले जातात?

 1. वनस्पतीला आवश्यक असलेले पोषण घटक पानांच्या माध्यमातून शोषून घेण्याची क्षमता रोपांमध्ये असते. रोपांच्या स्टोमाटा रंध्रांद्वारे आणि एपीडर्मिसद्वारे पोषण शोषणाचे काम होते.
 2. पोषणद्रव्यांचे वहन हे सहसा रंध्रांच्या माध्यमातून अधिक जलद होते, परंतु संपूर्ण शोषण हे एपीडर्मिसद्वारे अतिशय उत्तमप्रकारे होते.
 3. रोपे आपल्या सालीद्वारे देखील पोषक घटक शोषून घेऊ शकतात.

 
‘फोलिअर फीडिंग’ महत्वाचे का आहे?

 1. पोषणद्रव्यांच्या उपलब्धतेवर मातीच्या पीएच घटकाचा जो परिणाम होऊ शकतो तो दूर करण्याचे काम ‘फॉलियर फीडिंग’मुळे साधले जाते.
 2. ‘फोलिअर फीडिंग’मुळे पानांना अगदी तत्काळ पोषक घटक मिळतात. ‘फोलिअर फर्टिलायझेशन’मुळे खूप चटकन (एक तासाच्या आतच) रोपाचे आरोग्य आणि वाढ यांच्यात सुधारणा घडून यायला सुरुवात होते.
 3. ‘फोलिअर फीडिंग’मुळे रोपांमधील कमतरता दूर केल्या जातात, कमजोर किंवा रोगग्रस्त झालेल्या पिकांना पुन्हा जोम-शक्ती येते, वाढीचा वेग सुधारतो आणि अधिक चांगली रोपे उगवतात,जो अर्थातच सगळ्यांचा मूळ उद्देश असतो.
 4. जर मूळे बंदिस्त / अडकलेली असतील तर लगेचच फीडिंग’मुळे पोषण पुरवले जाते.
 5. रोपामधील पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी आणि एका ठराविक वाढीच्या टप्प्यावर रोपाच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘फोलिअर फीडिंग’ उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
 6. जमिनीतील कमी कस – गुणवत्तेची कमतरता दुरुस्त करण्यासाठी आणि अल्प आर्द्रतेच्या परिस्थितीत रोपांमध्ये पोषण पोचविण्यात अक्षम असलेल्या जमिनीची हतबलता दूर करण्यासाठी देखील ‘फोलिअर फीडिंग’ एक प्रभावी पद्धती असल्याचे सिद्ध झालेले आहे.
 7. दर एकरी उत्पादन वाढविण्यासाठी आणि पिकाचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘फोलिअर फर्टिलायझेशन’ हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ‘फोलिअर फीडिंग’मुळे दर एकरी उत्पादनात १२ टक्के ते २५ टक्के वाढ होऊ शकते.
 8. ‘फोलिअर फीडिंग’ अधिक प्रभावी आणि कमी खर्चिक आहे.
 9. याच कारणांसाठी या पद्धतीकडे जगभरातील कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले गेले आहे.

 
 
‘फोलिअर फीडिंग’चा उपयोग कोणकोणत्या परिस्थतीत करावा?
काही विशिष्ट परिस्थितीत जमिनीतून खते पुरवण्यापेक्षा ‘फोलिअर फीडिंग’चा अवलंब करणे खूप लाभदायक ठरते.

अ) मर्यादित परिस्थिती– ज्या ठिकाणी पर्यावरणातील परिस्थितीमुळे मुळांना पोषणद्रव्ये शोषून घेण्यात मर्यादा येतात, अशा परिस्थितीत ‘फोलिअर फीडिंग’चा अवलंब करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारच्या परिस्थिती पुढीलप्रमाणे – जमिनीचा पीएच खूप कमी किंवा खूप जास्त असणे, तापमानाचा तणाव, जमिनीची आर्द्रता खूप कमी किंवा खूप जास्त असणे, मुळांवर पडणारा रोग (मुळांचे रोग), पोषणद्रवांच्या शोषणावर परिणाम घडवून आणणाऱ्या किडींचे अस्तित्व, जमिनीत असलेला पोषक घटकांचा असमतोल इत्यादी.

 
ब) पोषणद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे– ‘फोलिअर फीडिंग’चा एक महत्वाचा फायदा म्हणजे पोषणद्रव्यांच्या उपलब्धतेला रोपांकडून अतिशय तत्काळ प्रतिसाद मिळतो.

 
क) वाढीच्या विशिष्ट टप्प्यामध्ये– वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये रोपांना वेगवेगळ्या प्रमाणात पोषणद्रव्यांची आवश्यकता भासत असते. जमिनीतील पोषक घटकांचा समतोल राखून ठेवणे काही वेळा खूप कठीण असते. वाढीच्या विशिष्ट टप्प्यात ‘फोलिअर फीडिंग’चा अवलंब केल्याने उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्हींमध्ये सुधारणा होऊ शकते.

 
‘फोलिअर फीडिंग’च्या प्रभावीपणात अधिक सुधारणा कशी करावी?

‘फोलिअर फीडिंग’च्या प्रभावीपणावर परिणाम घडवून आणणारे विविध घटक:

 1. ‘फोलिअर स्प्रे सोल्युशन’चा पीएच– रोपाला सहजतेने शोषून घेणे शक्य व्हावे, यादृष्टीने पोषणद्रव्ये ही विरघळण्याजोग्या स्वरूपातच असायला हवी. पोषणद्रव्यांच्या विरघळण्याच्या क्षमतेवर आणि पाण्यातील अन्य घटकांशी होणाऱ्या त्यांच्या संयोगावर पीएच घटकाचा परिणाम होत असतो. सर्वसाधारणपणे, आम्लारी (अॅसिडिक) पीएचमुळे पानांच्या पृष्ठभागाद्वारे पोषणद्रव्ये शोषली जाण्यामध्ये सुधारणा घडून येते.
 2. संक्रीयक घटकांचा (सरफेक्टंट) वापर– रोपांचा पर्णसंभार अधिक एकसमान व्हावा यासाठी संक्रीयक घटक योगदान देत असतात. पानांच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या थेंबांचा ताण कमी करून ते स्प्रे सोल्यूशनची धारणशक्ती वाढवण्यात मदत करतात.
  Mahadhan
    संक्रीयक घटकासह             संक्रीयक घटकाशिवाय
 3. दिवसातील वेळ– ‘फोलिअर फीडिंग’साठी दिवसातील सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा जेव्हा पानांची स्टोमाटा रंध्रे उघडलेली असतात. जेव्हा तापमान ८० अंश फॅरनहाईट (२७ डिग्री सेल्सिअस)च्या पुढे गेले असेल, तेव्हा ‘फोलियर फीडिंग’ न करण्याचा सल्ला दिला जातो.
 4. थेंबाचा आकार– छोटे थेंब अधिक मोठ्या भागात पसरतात आणि ‘फोलिअर फीडिंग’ची कार्यक्षमता वाढवतात. परंतु, जेव्हा थेंबांचा आकार खूपच लहान असतो (१०० मायक्रॉन्सपेक्षा कमी) तेव्हा ते वाहून जाण्याची शक्यता असते.Mahadhan
 5. फवारणीचे प्रमाण (स्प्रे व्हॉल्यूम))– फवारणीचे प्रमाण किती आहे, त्याचा पोषणद्रव्यांचे कार्यक्षमपणे शोषण होण्यावर लक्षणीय परिणाम घडून येत असतो. फवारणीचे प्रमाण इतपत असायला हवे की, रोपाच्‍या वरील संपूर्ण भागावर ते पसरेल परंतु एवढे जास्तही नसावे की जे पानांवरून ओघळून वाहून जाईल.
About The Author
Translate »
Mahadhan SMARTEK