चांगल्या मातीचे वैशिष्ट्य

चांगल्या मातीचे वैशिष्ट्य
December 3, 2018 No Comments Blog admin

Mahadhan

माती म्हणजे काय:
माती वनस्पतींच्या वाढीचे एक निसर्ग-निर्मीत माध्यम असून ते खनिजे, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायु (घन, द्रव व वायू) यांचे मिश्रण आहे.

खनिज पदार्थ:
हवामानाचे खडकांवरील हजारोवर्षे होत असलेल्या परिणामस्वरूप बनलेले असतात. उदा. वाळू, पोयटा व चिकण माती. या कणांचे प्रमाण व मांडणी, जमिनीची संरचना आणि पोत ठरवतात.

सेंद्रिय पदार्थ:
वनस्पती व प्राणी अवशेषांचे अनेक वर्ष विघटन झाल्यामुळे बनलेले असतात. हे माती कणांना एकत्रित बांधून सूक्ष्मजिवांसाठी अन्न व ऊर्जा स्रोत म्हणून कार्य करतात.

हवा:
माती आणि वनस्पतींच्या मुळांमधील वायुरूपी ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे विनिमय करते.

पाणी:
एक वाहक म्हणून कार्य करते, ज्यावाटे वनस्पतींना पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.

 

मातीचे कार्य

 • वनस्पतींना जमिनीवर उभे राहण्यास मदत.
 • पोषक अन्नद्रव्यांचा साठा व पुरवठा
 • पाण्याचा साठा व पुरवठा.
 • ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडच्या विनिमयास मदत.

 

चांगल्या मातीमध्ये विविध घटकांचे प्रमाण खालीलप्रमाणे असावे:

 • खनिज पदार्थ – ४५%
 • सेंद्रिय पदार्थ – १ ते ५%
 • सच्छिद्रता – ५०% (२५% पाणी आणि २५% हवा असलेल्या स्तिथीस ‘वापसा’ म्हणतात)

 

चांगली माती खालीलप्रमाणे असावी

 • हवा आणि पाण्याचे वहन सुलभरीतीने होण्यासाठी मातीचा पोत पोयट्याचा असावा.
 • सूक्ष्मजीवांची संख्या शाश्वत ठेवण्यासाठी मातीत पुरेशे सेंद्रिय पदार्थ असावेत.
 • मातीची भौतिक स्थिती चांगली राखण्यासाठी तिचा पोत व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण चांगले असावे.
 • मातीमधील वनस्पतींच्या मुळांची वाढ, पाण्याचा निचरा व वायू-विनिमय, या गोष्टींस पूरक अशी जडणघडण.
 • अन्नद्रव्य व जलधारण क्षमता चांगली राखण्यास चिकण मातीचे व सेंद्रिय पदार्थांचे पुरेशे प्रमाण असावे.
 • वनस्पतींची मुळे खोलवर जाण्यासाठी व पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी जमिनीची खोली व सच्छिद्रता चांगली असावी.
 • वनस्पतींच्या मुळांच्या कक्षेतील मातीच्या थरांचा सामू व अन्नद्रव्यांचे प्रमाण मुळांच्या वाढीसाठी चांगले असावेत.
About The Author
Translate »
Mahadhan SMARTEK