आडसाली ऊसाची लागवड करताना आणि वाढीच्या प्रारंभिक टप्प्यात घ्यावयाची काळजी

आडसाली ऊसाची लागवड करताना आणि वाढीच्या प्रारंभिक टप्प्यात घ्यावयाची काळजी
August 29, 2018 No Comments Blog admin

Mahadhan

आडसाली ऊसाची लागवड साधारण जुन ते ऑगस्ट महिन्या दरम्यान जेथे लागवड करायची त्या कृषी क्षेत्रातील मोसमी पावसाचे प्रमाण कसे आहे त्यानुसार केली जाते. आडसाली ऊसाला वाढीसाठी सुमारे १६ ते १८ महिने लागू शकतात आणि त्यामुळे उसाची सर्वाधिक क्षमता कामी येऊन अधिकाधिक साखर मिळण्यास यामध्ये वाव असतो. अधिक चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादकतेसाठी याची सुरुवात जोमदार व्हायला हवी आणि त्याने वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आघाडी घ्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली काळजी घेण्यासाठी पुढील काही मुद्दे उपयुक्त ठरतात :

  1. प्रारंभिक नांगरणीची क्रिया करताना खोलवर जाऊन नांगरणी (गरज भासल्यास दुहेरी) आणि ढेकळे फोडण्यासाठी दंताळे वापरून जमीन भुसभुशीत करून घेणे आणि जास्तीत जास्त तण काढून नष्ट करणे तसेच रोग आणि किडी दूर करणे अत्यंत महत्वाचे असते.
  2. शेतात एकसमान पद्धतीने सेंद्रिय खत फवारणी करण्याची गरज असते. सरी आणि वरंबे खुले करण्याआधी हे खत जमिनीत पुरेपूर सखोल मिसळले जाणे आवश्यक असते.
  3. लागवडीमध्ये शक्यतो ४X२ किंवा ५X२ फुटांचे अंतर ठेवल्याने चांगला परिणाम मिळतो. त्यानुसार सरी आणि वरंबे आधीच उघडून (खणून) ठेवणे योग्य ठरते.
  4. आपापल्या विभागातील आडसाली हंगामासाठी शिफारस केलेल्या ऊसाच्या जातीचीच लागवडीसाठी निवड करावी आणि नर्सरीतून आणलेले ९ ते १० महिन्यांचे निरोगी बियाणेच लागवडीकरीता वापरावे.
  5. लागवडीपुर्वी ऊसाच्‍या बेण्‍यास त्‍या त्‍या विभागासाठी शिफारस केलेल्‍या बुरशीनाशक आणि किटकनाशकांची प्रक्रिया करुन घ्‍यावी.
  6. लागवड करताना जमीन कोरडी किंवा सुयोग्य आर्द्रता असलेली असावी. ओल्या मातीतील लागवड टाळणेच श्रेयस्कर.
  7. कोंबावरील एक किंवा दोन डोळे शास्त्रीय पद्धतीने कापून वाफ्यामध्ये खोचावेत आणि मातीने हलकेच झाकावेत. असे करताना डोळा दोन्ही बाजूंनी मोकळा राहील असे पाहावे. यामुळे पीक उगवण्याची क्रिया वेगाने घडून येते.
  8. सुरुवात चांगली घडून येण्यासाठी शक्यतो अत्यावश्यक असेल तेवढाच खतांचा डोस पिकाच्या वाफ्यामध्ये घालावा आणि लागवड करण्याआधी तो मातीत व्यवस्थित मिसळून जाईल असे बघावे.
  9. पीक सगळीकडे एकसारखे उगवावे यासाठी पाण्याचा पुरवठा हलका आणि वरचेवर करावा; शक्यतो ठिबक सिंचनचा अवलंब करणे इष्ट ठरते.
  10. पीक उगवल्यानंतर महाधन स्मार्ट २४:२४:० + १३:००:४५ एका लीटरला प्रत्येकी दहा ग्रॅम या प्रमाणात एकरी ३०० लीटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारणी करावी. असे केल्याने जोमदार मुळे धरतात आणि अधिक जोमाने वाढ होते.
About The Author
Translate »
Mahadhan SMARTEK